Jagannath Temple : सर्पमित्रांच्या उपस्थितीत ४६ वर्षांनंतर उघडण्यात आला जगन्नाथ मंदिराचा खजिना; नेमकं कारण काय?

Jagannath Temple Ratna Bhandar : ओडिशातील १२व्या शतकातील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराच्या खजिन्याचे, रत्नभांडारचे दरवाजे आज सुमारे ४६ वर्षांनंतर उघडण्यात आले.
Puri Jagannath temple Ratna Bhandar opened today after 46 years  know all the details marathi
Puri Jagannath temple Ratna Bhandar opened today after 46 years know all the details marathi
Updated on

पुरी : ओडिशातील १२व्या शतकातील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराच्या खजिन्याचे, रत्नभांडारचे दरवाजे आज सुमारे ४६ वर्षांनंतर उघडण्यात आले. खजिन्यातील दागिने व इतर मौल्यवान वस्तूंची यादी करण्यासाठी तसेच दुरुस्तीसाठी रत्नभांडार पुन्हा खुले करण्यात आले. यापूर्वी, १९७८ मध्ये रत्नभांडार खुले झाले होते.

याबाबत राज्य सरकारने नेमलेल्या समितीच्या उपस्थितीत धार्मिक विधी झाल्यानंतर आज सकाळी बारा वाजता रत्नभांडार उघडले, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रत्नभांडारचा मुद्दा राजकीय अजेंड्यावर आला होता. रत्नभांडारच्या किल्ल्या गहाळ झाल्यावरुनही तेव्हा सत्तेवर असलेल्या बिजू जनता दलाला भाजपने लक्ष्य केले होते. त्याचप्रमाणे, ओडिशात सत्तेवर आल्यास खजिना पुन्हा उघडण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही दिले होते. या पार्श्वभूमीवर, आज रत्नभांडार खुले करण्यात आले. या वेळी ओडिशा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश विश्वनाथ रथ, श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाचे मुख्य प्रशासक अरविंद पाढी, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे अधीक्षक डी.बी. गडनायक आणि पुरीचे राजा गजपती महाराज यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Puri Jagannath temple Ratna Bhandar opened today after 46 years  know all the details marathi
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत गोळीबार, थोडक्यात बचावले माजी राष्ट्राध्यक्ष; पाहा थरारक व्हिडिओ

मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी पाढी म्हणाले, की मंदिराचा खजिना पुन्हा उघडण्यात आला असला तरी मौल्यवान वस्तूंची यादी त्वरित केली जाणार नाही. दागदागिन्यांचे मूल्यांकन करणारे, सोनार व इतर तज्ज्ञांच्या सहभागाबद्दल सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर केले जाईल. खजिन्याच्या बांधकामाच्या सुरक्षेची खात्री करण्यास आमचे प्रथम प्राधान्य असेल. दुरुस्तीचे काम झाल्यानंतर दागिने पुन्हा आणले जातील व त्यांची यादी केली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेसाठी तीन प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) ठरविण्यात आल्या आहेत. यात रत्नभांडार उघडण्यासाठी पहिली, स्ट्राँग रुममधील तात्पुरत्या खजिन्यासाठी दुसरी आणि दागिन्यांच्या यादीसाठी तिसरी एसओपी असेल, असेही त्यांनी सांगितले.

खजिन्याच्या बाहेरच्या कक्षाच्या तीन चाव्या होत्या. गजपती महाराज, मंदिर प्रशासन व सेवकांकडे प्रत्येकी एक चावी होती. खजिन्याचा आतील कक्ष उघडल्यावर मूळ चावी हरविली. त्यामुळे खजिना सीलबंद करून नवीन चावी जिल्हा कोशागारात जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येईल.

Puri Jagannath temple Ratna Bhandar opened today after 46 years  know all the details marathi
Donald Trump: ट्रम्प आणि मृत्यूमध्ये फक्त फक्त 2 सेमीचे अंतर... माजी राष्ट्राध्यक्षांच्या रॅलीत नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्री कार्यालयाने उडिया भाषेत ‘एक्स’वर पोस्ट करून यासंदर्भात माहिती दिली. ‘भगवान जगन्नाथाच्या इच्छेवरून उडिया समुदायाने उडिया अस्मितेची ओळख पुढे नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यापूर्वीही तुमच्या (उडिया समुदाय)इच्छेवरून जगन्नाथ मंदिराचे चार दरवाजे उघडण्यात आले होते. आज तुमच्या इच्छेवरून जगन्नाथ मंदिराच्या रत्नभांडारचे दरवाजे ४६ वर्षांनंतर पुन्हा उघडले,’ असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दागिन्यांसाठी विशेष पेट्या

खजिन्यातील दागिने व मौल्यवान वस्तू लाकडाच्या तात्पुरत्या ‘स्ट्राँग रुम’मध्ये हलविल्या जातील. या खास बनविलेल्या पेट्यांची आतील बाजू पितळी असून त्यांची लांबी ४.५ फूट, उंची व रुंदी २.५ फूट इतकी आहे. या लाकडी पेट्यांच्या स्ट्राँग रुमसाठी सीसीटीव्हीसह इतर आवश्यक व्यवस्थाही करण्यात आली आहे, अशी माहिती श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने दिली.

सर्पमित्रांनाही पाचारण

जगन्नाथ मंदिराच्या खजिन्यावर सर्प पहारा देत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे, सर्पमित्रांनाही पाचारण करण्यात आले आहे. सर्पमित्रांची दोन पथके तयार केली असून एक मंदिराच्या आत व दुसरे बाहेर असेल. आम्ही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.