जैन यांना धक्का; विशेष सीबीआय न्यायालयानेही जामीन अर्ज फेटाळला

Push to Satyendra Jain A special CBI court also rejected the bail application
Push to Satyendra Jain A special CBI court also rejected the bail applicationPush to Satyendra Jain A special CBI court also rejected the bail application
Updated on

नवी दिल्ली : सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांचा जामीन अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने (special CBI court) फेटाळला आहे. सध्या सत्येंद्र जैन यांना न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात राहावे लागणार आहे. राऊस एव्हेन्यू येथील विशेष न्यायाधीश गीतांजली गोयल यांच्या न्यायालयाने सत्येंद्र जैन यांना दिलासा नाकारताना सांगितले की, जैन यांना जामीन देणे हा खटल्याचा योग्य टप्पा नाही. (Satyendra Jain A special CBI court also rejected the bail application)

मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) तपास सुरू आहे. ईडीचे (ED) छापे अजूनही सुरू आहेत. त्यामुळे सत्येंद्र जैन यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. जैन सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. जैन यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे असलेले सर्व खाते दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना देण्यात आले.

Push to Satyendra Jain A special CBI court also rejected the bail application
मोतीलाल व्होरांच्या मुलाचे राहुल गांधींबाबत मोठे वक्तव्य; म्हणाले...

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ३० मे रोजी आपचे नेते आणि दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी कलमांखाली अटक केली. ईडीने यापूर्वी जैन आणि त्यांच्या नियंत्रणाखालील कंपन्यांची ४.८१ कोटींची स्थावर मालमत्ता जप्त केली होती.

तपास यंत्रणेने राम प्रकाश ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक अंकुश जैन, वैभव जैन, नवीन जैन, योगेश कुमार जैन आणि सिद्धार्थ जैन आणि अंकुश जैन यांचे सासरे आणि प्रुडन्स चालवणारे लाला शेर सिंग यांनाही अटक केली आहे. ग्रुप ऑफ स्कूल्स, जीवन विज्ञान ट्रस्टचे अध्यक्ष जी. एस. मथारू आणि जीवन विज्ञान ट्रस्टचे लाला शेर सिंग यांच्या ठिकाणी छापे टाकले. झडतीदरम्यान डिजिटल रेकॉर्ड जप्त करण्यात आले.

या प्रकरणी अटक करण्यात आली

मंगळवारी न्यायालयाने सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांच्या जामीन अर्जावरील निर्णय १८ जूनपर्यंत राखून ठेवला होता. जैन यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार एका प्रकरणात अटक केली होती. जैन यांना त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा जास्त मालमत्तेप्रकरणी अटक करण्यात आली होती. विशेष न्यायाधीश (पीसी ॲक्ट) गीतांजली गोयल यांनी सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) वतीने युक्तिवाद ऐकल्यानंतर जैन यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.