‘कुतुबमिनार पूर्वी विष्णुस्तंभ होता’ विहिंप नेत्याचा दावा, पूजा करण्याची मागितली परवानगी

कुतुबमिनार हा पूर्वी 'विष्णू स्तंभ' होता, असा दावा विश्व हिंदू परिषदेने (विहिप) रविवारी केला आहे.
kutubminar
kutubminarSakal
Updated on

कुतुबमिनार हा पूर्वी 'विष्णू स्तंभ' होता, असा दावा विश्व हिंदू परिषदेने (विहिप) रविवारी केला आहे. कुतुबमिनार हा पूर्वी विष्णू स्तंभ होता, नंतर त्याचे काही भाग मुस्लिम शासकाने पुन्हा बांधले आणि त्याचे नाव कुव्वत-उल-इस्लाम असे ठेवले असं विहिंपने म्हटले आहे. विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी दावा केला की, ही 73 मीटर उंच इमारत भगवान विष्णूच्या मंदिरावर बांधली गेली होती आणि हे मंदिर हिंदू शासकाच्या काळात बांधले गेले होते. बन्सल यांनी पीटीआयशी केलेल्या संभाषणात दावा केला की, "जेव्हा मुस्लिम शासक आले, तेव्हा 27 हिंदू-जैन मंदिरे पाडल्यानंतर मिळालेल्या साहित्यातून काही भागाची पुनर्बांधणी करण्यात आली आणि त्याचे नाव कुव्वत-उल-इस्लाम ठेवण्यात आले. त्यांनी दावा केला की मुस्लिम शासकांनी पुनर्बांधणीसाठी अनेक प्रयत्न केले. काही वरच्या मजल्यांचे त्यांनी नुकसान केले होते, परंतु ते तसे करू शकले नाहीत.

kutubminar
हॉटेल ताजबद्दलच्या या 10 गोष्टी फार कमी लोकांना माहित आहेत

बन्सल यांनी दावा केला आहे की, “कुतुबमिनारच्या पहिल्या तीन मजल्यांच्या संरचनेत आणि वरच्या मजल्यावरील संरचनेत स्पष्ट फरक दिसून येतो. हे मजले त्यांनी उभारले होते कारण त्यांना फक्त इस्लामचे वर्चस्व दाखवायचे होते.” बसल यांनी असाही दावा केला की, “खरेतर तो विष्णू मंदिरावर बांधलेला विष्णुस्तंभ होता. मुस्लिम राज्यकर्त्यांना तो बनवला नव्हता. तो आमच्या हिंदू राज्यकर्त्यांनी बांधला होता.

सरकारने कुतुबमिनार परिसरातील प्राचीन मंदिरांची पुनर्बांधणी करावी आणि तेथे हिंदू विधी आणि प्रार्थना पुन्हा सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विहिंपने शनिवारी केली. 1993 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून नियुक्त केलेल्या स्मारकाच्या संकुलाला बन्सल यांच्यासह विहिंप नेत्यांच्या एका गटाने भेट दिली. राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाचे (NMA) अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे नेते तरुण विजय यांनी गुरुवारी सांगितले की, कुतुबमिनार संकुलात अपमानास्पद पद्धतीने ठेवलेल्या गणेशमूर्ती एकतर काढून टाकल्या पाहिजेत किंवा आदरपूर्वक स्थापित केल्या पाहिजेत.

kutubminar
Photo: राजधानीतील वास्तूला ‘इंडिया गेट’ उगीच म्हणत नाहीत; तर...

त्यांनी पीटीआयला सांगितले, "मूर्ती सध्या अत्यंत चुकीच्या ठिकाणी ठेवल्या आहेत. मूर्ती काढून टाकल्या पाहिजेत किंवा कुतुब परिसरात आदरपूर्वक ठेवल्या पाहिजेत. असे त्यांनी पीटीआयला सांगितले. हा मुद्दा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) यांच्यासमोर काही काळापूर्वी उपस्थित करण्यात आला होता. मात्र पत्राला अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही.

विहिंपचे प्रवक्ते बन्सल म्हणाले, "तरुण विजय जी यांनी हा मुद्दा एएसआयकडे मांडला आहे. आम्हाला आशा आहे की सरकार आणि संबंधित विभाग या विषयावर गांभीर्याने विचार करतील " या मुद्द्यावर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली जाईल आणि गरज पडल्यास कायदेशीर कारवाई करण्याचाही विचार करू, असे ते म्हणाले. दिल्लीच्या पर्यटन वेबसाइटनुसार, दिल्लीच्या शेवटच्या हिंदू राज्याच्या पराभवानंतर त्या ठिकाणावरील २७ हिंदू मंदिरे नष्ट केल्यानंतर मिळालेल्या साहित्यातून कुतुबमिनार बांधण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.