यीट्स यांनाही टागोरांच्या कविता आवडल्याने त्यांनी गीतांजली पुस्तकच वाचण्यासाठी मागविले. गीतांजलीची चर्चा पाश्चिमात्य देशांमध्ये होऊ लागली. अखेर १९१३मध्ये त्यांना साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले.
Rabindranath Tagore Birth Anniversary: सन १९१३. हे वर्ष भारतासाठी ऐतिहासिक असंच होतं. कारण यावर्षी पहिल्यांदाच कोणत्यातरी भारतीय व्यक्तीला जागतिक स्तरावरील नोबेल पारितोषिक (Nobel Prize) मिळाले होते. त्या व्यक्तीचं नाव गुरुदेव रविंद्रनाथ टागोर (Rabindranath Tagore). आजच्याच दिवशी १८६१ मध्ये टागोरांचा जन्म झाला. टागोरांना साहित्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नोबेल देण्यात आला आणि भारताला मिळालेला हा साहित्यातील एकमेव नोबेल ठरला आहे. (Rabindranath Tagore Birth Anniversary known facts about the Bard of Bengal)
भावंडांमध्ये सर्वात लहान असलेल्या रविंद्रनाथ टागोरांचा जन्म ७ मे १८६१ रोजी कोलकातामध्ये झाला. त्यांच्या कुटुंबातच साहित्यिक वातावरण असल्याने लहानपणापासून त्यांनाही पुस्तके, कविता, ग्रंथ यामध्ये आवड निर्माण झाली. कायद्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांना इंग्लंडला पाठविण्यात आले. पण तिथं काही त्यांचं मन लागलं नाही. त्यामुळे शिक्षण पूर्ण न करताच ते मायदेशी परतले.
कविता लेखनात रुची असलेल्या टागोरांना हे घरच्यांना आवडणार नाही, अशी भीती होती. याचदरम्यान त्यांनी भानु सिंह या टोपणनावाने 'मैथिली' हा कवितासंग्रह लिहला. या कविता त्यांनी कुटुंबातील सर्वांना ऐकवल्या. त्या ऐकून सर्वजण खूश झाले. त्यानंतर त्यांनी बांग्लामध्ये लेखनास सुरवात केली.
इंग्लंडहून बंगालला परतल्यानंतर त्यांनी मृणालिनी देवीशी लग्न केले. एखाद्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी निसर्गाचा सहवास सर्वात उत्तम पर्याय आहे, असा गुरुदेवांचा विश्वास होता. यामुळेच १९०१मध्ये ते शांतिनिकेतन येथे आले. याठिकाणी त्यांनी खुल्या वातावरणात झाडाखाली शिकवायला सुरवात केली.
असा मिळाला नोबेल
'गीतांजली' या कवितासंग्रहासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळाला. गीतांजली ही बांग्ला भाषेत लिहली होती. त्यानंतर टागोरांनी गीतांजलीमधील कवितांचे इंग्रजीत अनुवाद करण्यास सुरवात केली. त्यापैकी काही कविता त्यांनी त्यांच्या चित्रकार मित्र विल्यम रोथेन्स्टाईन यांना ऐकवल्या. विल्यम यांना या कविता खूप आवडल्या. आणि त्यांनी या कविता प्रसिद्ध कवी डब्ल्यू. बी. यीट्स यांना वाचण्यासाठी दिल्या. यीट्स यांनाही टागोरांच्या कविता आवडल्याने त्यांनी गीतांजली पुस्तकच वाचण्यासाठी मागविले. गीतांजलीची चर्चा पाश्चिमात्य देशांमध्ये होऊ लागली. अखेर १९१३मध्ये त्यांना साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले. ७ ऑगस्ट १९४१ रोजी कोलकाता येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
विशेष गोष्ट म्हणजे वयाच्या ८व्या वर्षी टागोरांनी पहिली कविता लिहली. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांची पहिली लघुकथा प्रकाशित झाली. टागोर असे एकमेव व्यक्ती आहेत, ज्यांनी २ देशांचे राष्ट्रगीत लिहले आहे. भारताचे राष्ट्रगीत 'जन गन मन' आणि बांगलादेशचे राष्ट्रगीत 'आमार सोनार बांग्ला' या रचना टागोरांच्या आहेत. टागोरांनी आयुष्यभरात २२०० हून अधिक गीतांची रचना केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.