स्मृती सागरिका कानुनगो
भुवनेश्वर : कुनोतील चित्याच्या मृत्यू त्याच्या गळ्यातील रेडिओ कॉलरमुळे झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आल्याने उर्वरित चित्त्यांची रेडिओ कॉलर काढण्यात आली आहे. याउलट ओडिशातील हत्तींच्या हालचालींवर देखरेख ठेवण्यासाठी त्यांना रेडिओ कॉलर लावण्याचा विचार तेथील वन विभाग करीत आहे.
ओडिशात मानवी वस्तींमध्ये हत्ती घुसण्याच्या आणि हत्ती-मानव संघर्षाच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत. त्यामुळे कर्नाटक व तमिळनाडूप्रमाणे हत्तींना रेडिओ कॉलर लावण्याचा विचार वनविभाग करीत आहे.
प्रधान वनसंरक्षक आणि मुख्य वन्यजीव रक्षक एस.के.पोपली म्हणाले, की हत्तींवर रेडिओ कॉलर लावण्याचा प्रयोग कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये यशस्वी झाला आहे. हा प्रयोग ओडिशात करण्यासाठी आम्ही ‘एशियन नेचर कॉन्झर्वेशन फाउंडेशन आणि इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स’ या संस्थांबरोबर सामंजस्य करार केलेला आहे.
कोरोनाच्या साथीमुळे या प्रक्रियेला विलंब लागला असल्याने पावसाळा संपला की साधारणपणे ऑक्टोबरमध्ये हत्तींना रेडिओ कॉलर लावण्याचे काम सुरू करण्यात येईल.
‘‘पथदर्शी प्रकल्पात तीन हत्तींच्या रेडिओ कॉलर लावण्यात येणार आहे. राज्यातील ढेंकनल किंवा अंगुल वनपरिक्षेत्रात हा प्रकल्प राबविण्यात येईल.
मात्र याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. हत्तींच्या गळ्यात कॉलर लावण्यात येणार असून ती टस्करला बसवायची की कळपातील एखाद्या मादीला हे तज्ज्ञ ठरवतील. रेडिओ कॉलरद्वारे माहितीतून हत्तींच्या कळपांच्या हालचालींवर लक्ष ठेवता येईल,’’ असे पोपली यांनी सांगितले.
संघर्ष टाळण्यासाठी ‘गजसाथी’
ओडिशात मानव व हत्ती संघर्ष आणि रेल्वेखाली येऊन हत्तींचा मृत्यू होण्याच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त होत आहे. यासाठी आम्ही स्वयंसेवकांच्या मदतीने ‘गजसाथी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. याद्वारे स्थानिकांशी संवाद साधून जनजागृती करण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत दोन हजार गावांचा समावेश करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत बाराशे गावांमध्ये हा उपक्रम सुरू झाला. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक गावातील पाच युवकांची गजसाथी म्हणून नियुक्ती करण्यात येते. ग्रामस्थांत जनजागृती करण्याबरोबरच कळपांच्या हालचालींची माहिती देण्यासाठी ते मदत करतात.
ओडिशातील हत्तींचे मृत्यू व कारणे
२०११ ते २०२२
८६ -२०२१ मध्ये
१४१ -अपघातामुळे
१३५ -विजेच्या धक्क्याने
३०७ -रोगांमुळे
४८ -शिकार
११९ -नैसर्गिक मृत्यू
१३१ -कारण अज्ञात
९३५ -एकूण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.