Rahul Gandhi: 'संसदेत घुसखोरी झाली तेव्हा भाजप खासदार पळून गेले', सुरक्षेतील त्रुटींवर राहुल गांधींनी दिली प्रतिक्रिया

इंडिया आघाडीच्या 143 खासदारांच्या निलंबनाच्या निर्णयाविरोधात जंतरमंतरवर विरोधी पक्षांनी निदर्शने केली. यावेळी राहुल गांधींनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला.
Rahul Gandhi
Rahul Gandhi Esakal
Updated on

इंडिया आघाडीच्या 143 खासदारांच्या निलंबनाच्या निर्णयाविरोधात जंतरमंतरवर विरोधी पक्षांनी निदर्शने केली. यावेळी राहुल गांधींनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. संसदेच्या सुरक्षेतील त्रुटी, व्हिडिओ शूटिंग या मुद्द्यांवरही राहुल यांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. संसदेत घुसखोरी झाली की, भाजप खासदार पळून गेले, असंही ते यावेळी म्हणालेत.

संसदेच्या सुरक्षेबाबत राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना केंद्र सरकारला अनेक प्रश्न केले आहेत. राहुल यांनी विचारले की, संसदेच्या सुरक्षेत कसली कसूर झाली, हे तरुण संसदेत कसे आले? संसदेच्या आत गॅस स्प्रे कसा आणला, जर ते गॅस स्प्रे आणू शकत असतील तर ते संसदेत काहीही आणू शकतात. राहुल म्हणाले, प्रश्न असा आहे की, या तरुणांनी संसदेत घुसखोरी का केली? ते म्हणाले, याचं कारण बेरोजगारी आहे. आज देशातील तरुणांना रोजगार मिळत नाही. देशात प्रचंड बेरोजगारी आहे.

Rahul Gandhi
Manoj Jarange: इतर ठिकाणी समानता चालते मग आरक्षणात का नको? जरांगेंचा सवाल

ही द्वेष आणि प्रेम यांच्यातील लढाई

काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले की, आम्ही सर्व विरोधी पक्ष नेते आणि विरोधी पक्षाचे कार्यकर्ते एकत्र उभे आहोत. ही लढाई द्वेष आणि प्रेम यांच्यातील लढाई आहे. द्वेषाच्या बाजारात आपण प्रेमाचे दुकान उघडतोय. तुम्ही जितका द्वेष पसरवाल... तितकी इंडिया आघाडी प्रेम पसरवेल.

Rahul Gandhi
Chhagan Bhujbal : 'व्याही, पत्नीचे आई-वडील यांनाही आरक्षण दिलं पाहिजे...'; मनोज जरांगेंवर भुजबळांची उपरोधक टीका

तत्पूर्वी, लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी विरोधकांच्या निदर्शनास संबोधित करताना, मोदी सरकारचा अहंकार मोडून काढण्याची वेळ आली आहे. जर मोदी सरकारला वाटत असेल की, ते खासदारांचे निलंबन करून आम्हाला घाबरवू शकते किंवा झुकवू शकते, परंतु इंडिया आघाडी ना घाबरली आहे आणि न झुकली आहे, आम्ही लढायला तयार आहोत. कारण लढा आपल्या रक्तात, डीएनएमध्ये आणि इतिहासात आहे, असं ते म्हणाले आहेत.

त्याचवेळी काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला म्हणाले की, जर देशातील संसदेत लोकांना आवाज उठवू देत नसेल तर संसदेची गरजच काय? मोदी सरकार देशाच्या संविधानाचा गळा घोटत आहे. आज भारताची लोकशाही धोक्यात आहे. अशा परिस्थितीत इंडिया आघाडी गप्प बसणार नाही, आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत देशातील जनतेसाठी लढणार आहोत.

Rahul Gandhi
'कर्नाटकच्या राजकारणातही एकनाथ शिंदे-अजित पवार, त्यामुळं काहीही घडू शकतं'; माजी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()