Rahul Gandhi: फक्त 14 दिवस! राहुल गांधींनी वायनाड, रायबरेली पैकी एक जागा नाही सोडली तर काय होणार?

Bareli Or Wayanad: राहुल यांनी केरळातील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेलीतून निवडणूक लढवत दोन्ही ठिकाणी विजय मिळवला आहे. आता ते कोणत्या जागेवरून राजीनामा देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Rahul Gandhi Rae Bareli Or Wayanad
Rahul Gandhi Rae Bareli Or Wayanad
Updated on

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने दमदार यश मिळवले पण त्यांना सत्तेपर्यंत पोहचता आले नाही. या निवडणुकीत जोरदार फॉर्ममध्ये असलेल्या राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या 99 जाग निवडून आणण्यात सिंहाचा वाटा तर उचललाच पण त्यांनी लढलेल्या वायनाड आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघातून विजय मिळवला.

असे असले तरी नियामानुसार दोन जागांवर विजयी झालेल्या उमेदवाराला एकाच मतदारसंघातील खासदार म्हणून राहता येते. त्यामुळे राहुल यांना वायनाड आणि रायबरेली या दोन्हीपैकी एका ठिकाणाहून खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे.

काय आहे नियम?

घटनात्मक नियमानुसार, जर एखाद्या आमदाराने लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली किंवा उमेदवार दोन जागांवरून निवडणूक जिंकला, तर त्याला त्याच्या निवडीच्या तारखेपासून 14 दिवसांच्या आत एका सभागृहाचे सदस्यत्व सोडावे लागते.

एकच व्यक्ती दोन ठिकाणांवरून पदावर राहिल्यास सत्ता एकाच्यात हाता राहते. त्यामुळे इतर लोकांना सत्तेमध्ये स्थान मिळण्यास अडचण येते. त्यामुळे दोन ठिकाणी जिंकल्याल्या उमेदवाराला एका ठिकाणचे पद सोडावे लागते, असा नियम आहे.

Rahul Gandhi Rae Bareli Or Wayanad
Bribe On EMI: हेच पाहायचे राहिलं होतं! 'EMI'वर लाच घेणाऱ्या पोलिसाला दणका, पहिला हप्ता घेताना पकडले रंगेहात

एका जागेवरून राजीनामा नाही दिला तर काय?

दोन जागांवरून लढत दोन्हीकडे विजय मिळवणाऱ्या उमेदवाराला निकाल लागल्यापासून 14 दिवसांच्या आत एका ठिकाणाहून राजीनामा द्यावा लागतो. नव्या लोकसभा अध्यक्षांची निवड होण्यापूर्वी उमेदवार आपला राजीनामा चालू लोकसभेच्या अध्यक्षांकडे देता येतो.

या दोन्ही ठिकाणांहून जिंकलेल्या उमेदवाराने एका जागेवरून राजीनामा न दिल्यास त्याला विजयी झालेल्या दोन्ही जागा गमावण्याचा धोका असतो.

Rahul Gandhi Rae Bareli Or Wayanad
Loksabha Speaker :  लोकसभेच्या अध्यक्षांची निवड कशी केली जाते? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

यापूर्वी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, सोनिया गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आता राहुल गांधी यांनी दोन जागांवर निवडणुका लढवत दोन्ही ठिकाणी विजय मिळवला आहे.

१९९६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी लखनौ आणि गांधीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांनी दोन्हीकडे विजय मिळवला. पण त्यांनी अखेर लखनौची जागा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.

1999 मध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कर्नाटकातील बेल्लारी आणि उत्तर प्रदेशातील अमेठीमधून निवडणूक लढवली होती. दोन्ही ठिकाणी त्या विजयी झाल्या. पण विजयानंतर त्यांनी बेल्लारीतून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता.

2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील वडोदरा आणि उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून सार्वत्रिक निवडणूक लढवली होती. त्यांनी दोन्ही जागा जिंकल्या पण वाराणसीची जागा कायम ठेवली.

आता यावेळी राहुल यांनी केरळातील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेलीतून निवडणूक लढवत दोन्ही ठिकाणी विजय मिळवला आहे. आता ते कोणत्या जागेवरून राजीनामा देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.