Rahul Gandhi : काँग्रेसचे आता ‘मिशन दिल्ली’;राहुल गांधी यांनी साधला कामगारांशी संवाद

गेल्या ११ वर्षांपासून दिल्लीतील काँग्रेसचे संपलेले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ६ महिन्यांनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वेगाने पावले उचलायला सुरुवात केली आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhisakal
Updated on

नवी दिल्ली : गेल्या ११ वर्षांपासून दिल्लीतील काँग्रेसचे संपलेले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ६ महिन्यांनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वेगाने पावले उचलायला सुरुवात केली आहे. ‘जीटीबी’नगरातील रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांशी त्यांनी आज चर्चा केली व त्यांचे प्रश्न जाणून घेतले. असंघटित कामगार देशाच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असल्याचे त्यांनी नमूद केले.

काँग्रेसचे २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत ७ आमदार दिल्ली विधानसभेत निवडून आले होते. परंतु त्यानंतर २०१५ व २०२० च्या निवडणुकीत काँग्रेसचा एकही आमदार निवडून येऊ शकला नव्हता. लोकसभा निवडणुकीत ‘आप’शी आघाडी करूनही काँग्रेसला एकही खासदार दिल्लीतून निवडून आणता आलेला नाही. परंतु दिल्लीतील तीन पैकी दोन लोकसभा मतदारसंघांत काँग्रेसच्या उमेदवारांनी चांगलीच लढत दिली. ‘आप’शी केलेल्या आघाडीतून काँग्रेसला फारसा फायदा झाल्याचे दिसून न आल्याने आता विधानसभा निवडणूक मात्र स्वबळावर लढण्याचा पक्षाचा विचार आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात दिल्ली विधानसभेची निवडणूक होणार आहे.

म्हणून कामगारांकडे लक्ष

‘‘राहुल गांधी यांनी आज ‘जीटीबी’नगरातील रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांशी चर्चा केली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. रोजंदारीवर काम करणारे हे कर्मचारी देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत त्यांच्यासाठी काँग्रेसने जाहीरनाम्यात अनेक योजना जाहीर केल्या होत्या. मनरेगा शहरात राबविण्याचा मनोदय व्यक्त केला होता,’’ असे राहुल गांधी यांनी सांगितले. हा कामगार सध्या ‘आप’कडे आकृष्ट झालेला आहे. या कामगारांना काँग्रेसकडे वळविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात असल्याचे बोलले जात आहे. यावेळी दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र यादव यांच्यासह दिल्ली काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते.

‘आप’पासून काँग्रेस दोन हात दूर

पंजाबमध्ये ज्याप्रमाणे ‘आप’च्या विरोधात लढल्यानंतरही लोकसभेत ७ सदस्य निवडून आले. त्याचप्रमाणे दिल्लीतही ‘आप’च्या विरोधात लढल्यास काँग्रेसला फायदा होईल असा दिल्ली काँग्रेसच्या नेत्यांचा कयास आहे. त्यानुसार आता काँग्रेस विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखत असल्याचे सांगण्यात आले. भ्रष्टाचारामुळे ‘आप’वर होत असलेल्या आरोपापासून दूर राहण्यासाठी काँग्रेसने ‘एकला चलो रे ची भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले.

हाथरसला भेट देणार

उत्तरप्रदेशातील हाथरस येथे एका धार्मिक कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत १२३ भाविक मरण पावले होते. राहुल आता मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करणार आहेत. त्याचप्रमाणे या दुर्घटनेत जखमी झालेल्यांचीही ते विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात जातील. या संदर्भात काँग्रेसचे संघटन सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी माध्यमांना माहिती दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.