मोफत रेशनसाठी तिरंगा घेण्यास भाग पाडणे लाजिरवाणे; राहुल गांधींचा भाजपवर निशाणा

मोदी सरकारने २० कोटी घरांवर तिरंगा लावण्याचा निर्णय घेतला आहे
Congress rahul Latest News
Congress rahul Latest NewsCongress rahul Latest News
Updated on

Congress rahul News नवी दिल्ली : हरयाणामध्ये मोफत रेशन (Ration) देण्याआधी गरिबांना २० रुपयांचा तिरंगा (National Flag) विकत घेण्यास भाग पाडल्याच्या घटनेचा काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी निषेध केला आहे. ‘तिरंगा हा आमचा अभिमान आहे. तो प्रत्येकाच्या हृदयात आहे. राष्ट्रवाद कधीच विकता येत नाही. रेशन देण्याऐवजी तिरंगाच्या नावावर गरिबांकडून २० रुपये उकळले जात आहेत. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. तिरंगा सोबतच भाजप सरकार देशातील गरिबांच्या स्वाभिमानावरही आघात करीत आहे’ अशी फेसबुक पोस्ट राहुल गांधी यांनी लिहिली आहे.

‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत मोदी सरकारने २० कोटी घरांवर तिरंगा (National Flag) लावण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप शासित राज्ये सरकारच्या या मोहिमेचा फायदा घेत आहेत. हरयाणात सोशल मीडियावर मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मेसेजमध्ये रेशन धारकांना झेंडे खरेदी केल्याशिवाय रेशन दुकानदारांना रेशन मिळणार नाही, असे लिहिले आहे.

Congress rahul Latest News
Jammu Kashmir : लतीफसह तीन दहशतवादी ठार; लष्कराने घेतला भटच्या हत्येचा बदला

सर्व शिधापत्रिकाधारक झेंडा घेण्यासाठी २० रुपये घेऊन रेशन दुकानात पोहोचावे असे संदेशात लिहिले आहे. झेंडा न घेणाऱ्यांना ऑगस्ट महिन्याचा गहू दिला जाणार नाही. हा मेसेज केवळ हरियाणामध्येच नाही तर देशभरात व्हायरल झाला आहे.

यानंतर भाजप खासदार वरुण गांधी (varun gandhi) यांनी ट्विट केले आहे. त्यांनी व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये लोक म्हणताहेत की, आमच्याकडे रेशन (Ration) घेण्यासाठी पैसे नाहीत आणि तिरंगा घेण्यासाठी पैसे कुठून आणायचे.

Congress rahul Latest News
संजय राठोड यांनी मौन सोडलं; चित्रा वाघ यांना अप्रत्यक्ष इशारा देत म्हणाले...

या प्रकरणावर भाजप (BJP) नेते वरुण गांधी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. वरुण गांधी यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्धापन दिनाचा उत्सव गरिबांवर बोजा झाला तर हे दुर्दैवी ठरेल.

रेशन कार्ड धारकांना तिरंगा खरेदी करण्यास भाग पाडले जात आहे किंवा त्याबदल्यात त्यांच्या वाट्याचे रेशन कापले जात आहे. प्रत्येक भारतीयांच्या हृदयात असलेल्या तिरंग्याची किंमत वसूल करणे लाजिरवाणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.