नवी दिल्लीः भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधींची राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर तुफान फटकेबाजी सुरुय. भाजप आणि संघाने देशात हिंसेचं, द्वेषाचं राजकारण सुरु केल्याचं राहुल गांधी म्हणत आहेत. आता तर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कौरवांची उपमा दिली.
राहुल गांधी म्हणाले की, एकविसाव्या शतकातले कौरव म्हणजे आरएसएस आहे. हे कौरव पँट घातलतात आणि हातात काठी घेऊन शाखेत जातात. त्यांच्याकडे हिंदुस्थानातले दोन-तीन सगळ्यात श्रीमंत अरबपती असल्याची टिपण्णी राहुल यांनी केली.
हेही वाचाः प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....
राहुल गांधींच्या टीकेची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मागील काही दिवसांपासून ते संघ आणि भाजपवर जोरदार टीका करीत आहेत. भारत जोडो यात्रा ही देशामध्ये प्रेम आणि एकता अबाधित ठेवण्यासाठी असल्याचं राहुल गांधी सांगत आहेत. शिवाय ही यात्रा आपली इमेज घडवण्यासाठी नसल्याचंही ते म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले की, राहुल गांधी जो तुमच्या डोक्यात आहे, त्याला मी मारलं आहे. तो माझ्या डोक्यात नाहीये, तो निघून गेला. तुम्ही ज्या माणसाला बघताय, तो राहुल गांधी नाही. फक्त आपल्याला तसं वाटतंय.
''तुम्हाला विश्वास नसेल तर हिंदू धर्माला वाचा. शिवजींना वाचा. राहुल गांधी तर तुमच्या आणि भाजपच्या डोक्यात आहे. परंतु माझ्या डोक्यात नाही.''
मला 'इमेज'ची पर्वा नाही- राहुल गांधी
मला माझ्या इमेजची पर्वा नाहीये. तुम्ही जी माझी इमेज बनवणार आहात, तशी बनवा. मला याचा काहीही फरक पडत नाही. मला फक्त माझं काम करायचं आहे. शिवाय माझी प्रतिमा किती बदलली आणि किती नाही हे तर तुम्हालाच ठरवायचं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.