Rahul Gandhi on Gautam Adani : अदानींना मोदींचे संरक्षण; अमेरिकेतील आरोपांनंतर राहुल यांचा हल्लाबोल

Rahul Gandhi criticized Prime Minister Modi : उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरोधात अमेरिकेतील न्यायालयात दाखल झालेल्या भ्रष्टाचार आरोपांवरून राजकीय वातावरण तापले आहे. राहुल गांधी यांनी अदानींना अटक होणार नाही, असा आरोप पंतप्रधानांवर केला.
Rahul Gandhi on Gautam Adani
Rahul Gandhi on Gautam Adanisakal
Updated on

नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा धुरळा नुकताच खाली बसला असतानाच उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरोधात अमेरिकेतील न्यायालयात दाखल झालेल्या आरोपांवरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. ‘‘अदानी यांनी भारत व अमेरिकेतील कायद्यांचे उल्लंघन करत २१०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. याप्रकरणी अमेरिकेत आरोपही निश्‍चित झाल्याने त्यांना अटक करावी. मात्र, अटक होणार नाही कारण, किरकोळ रकमेच्या अपहाराबद्दल मुख्यमंत्र्यांना तुरुंगात डांबणाऱ्या पंतप्रधानांचे अदानींना संरक्षण आहे,’’ असा हल्लाबोल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.