Rahul Gandhi Defamation Case : आज फैसला! राहुल गांधींचं काय होणार? दोन वर्ष शिक्षा की…

Rahul Gandhi Defamation Case gujarat high court decision today BJP PM modi marathi political news
Rahul Gandhi Defamation Case gujarat high court decision today BJP PM modi marathi political news Esakal
Updated on

Gujarat High Court Update : राहुल गांधी यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. आज, शुक्रवारी (७ जुलै) मोदी आडनावाशी संबंधित बदनामी प्रकरणात सुनावलेल्या शिक्षेविरुद्ध काँग्रे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या याचिकेवर गुजरात उच्च न्यायालय सकाळी ११ वाजता निकाल देणार आहे.

गुजरातचे भाजप नेत पुर्णेश मोदी यांनी निवडणूकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 'मोदी चोर है' या शब्दांचा वापर करत केलेल्या वक्तव्याविरोधात सुरत कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्यात राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची खासदारकी देखील गेली. दरम्यान आज या प्रकरणात मोठा निकाल येणार आहे.

प्रकरण काय आहे?

सुरत कोर्टाने २३ मार्च रोजी दिलेल्या निर्णयानुसार या मानहाणीच्या खटल्यात राहुल गांधी यांना दोषी ठरवण्यात आले होते आणि त्यांना २ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. यामुळे राहुल गांधी यांना खासदारकी देखील गमवावी लागली. यानंतर सेशन कोर्टात पुन्हा अपील करण्यात आली होती, ती फेटळण्यात आली. यानंतर राहुल गांधी यांच्याकडून गुजरात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. दरम्यान हायकोर्टाने २ मे रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. यानंतर आता आज ७ जुलै रोजी गुजरात हायकोर्ट या प्रकरणात निर्णय देणार आहे.

Rahul Gandhi Defamation Case gujarat high court decision today BJP PM modi marathi political news
Buldhana Bus Accident : दारूने घेतला २५ निष्पापांचा बळी? बुलढाणा अपघातात मोठी अपडेट आली समोर

...तर काय होईल?

आज जर राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली तर त्यांची खासदारकी परत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. मा६ जर स्थगिती मिळाली नाही, तर दोन वर्षांची शिक्षा राहुल गांधी यांना भोगावी लागू शकते. मात्र यासगळ्यात महत्वाचे म्हणजे राहुल गांधींची खासदारकी आठ वर्षांसाठी धोक्यात येऊ शकते.

Rahul Gandhi Defamation Case gujarat high court decision today BJP PM modi marathi political news
Maharashtra Election News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली! निवडणूक आयोगाच्या पत्रात उल्लेख

राहुल गांधींकडे पर्याय काय आहेत?

जर राहुल गांधी यांना दिलासा मिळाला नाही तर राहुल गांधी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करू शकतात किंवा गुजरात हायकोर्टाच्या मोठ्या बेंचकडे अपील करण्याचा पर्याय देखील राहुल गांधी यांच्याकडे आहे.

संसदेचं पावसाठी अधिवेशन २० जुलै रोजी सुरु होत आहे त्यामुळे राहुल गांधी यांच्या खासदारकीबद्दल काय निर्णय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच कोर्टाने दिलासा दिला नाही तर वायनाडमध्ये पोटनिवडणूक जाहीर होणार का हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.