Rahul Gandhi Defamation Case: शिक्षेला स्थगिती देण्याची राहुल गांधींची याचिका मंजूर, सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी

Supreme Court : सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची 21 जुलै रोजी सुनावणी ठेवली आहे. गुजरात कोर्टाच्या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी यापूर्वी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्यांनी निकाल कायम ठेवला होता.
Rahul Gandhi News
Rahul Gandhi Newssakal
Updated on

New Delhi : राहुल गांधी यांनी 'मोदी आडनाव' बदनामी प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केली आहे.

सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची 21 जुलै रोजी सुनावणी ठेवली आहे. गुजरात कोर्टाच्या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी यापूर्वी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्यांनी निकाल कायम ठेवला होता.

Rahul Gandhi News
Monsoon Session 2023: उपसभापती नीलम गोऱ्हे यांना हटवण्याच्या मुद्यावरून आज बैठक, फडणवीस यांच्यासह 'हे' नेते राहणार उपस्थितीत

दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने 21 जुलै रोजी सुनावणी घेण्याचे मंगळवारी मान्य केले. राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे.

गुजरात न्यायालयाने मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी यांच्या दोषी आणि दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा स्थगित करण्यास नकार दिला होता. ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी या प्रकरणाचा उल्लेख करून लवकर सुनावणी घेण्याची मागणी केल्यानंतर भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी गांधींच्या अपीलावर सुनावणीची तारीख निश्चित केली.

Rahul Gandhi News
Kirit Somaiya Viral Video: 'मी कोणत्याही महिलेवर अत्याचार केलेला नाही'; कथित व्हिडीओ प्रकरणी सोमय्यांची चौकशीची मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.