Rahul Gandhi Disqualified: 'मोदी' संदर्भात प्रश्न विचारताच राहुल गांधी पत्रकारांवर भडकले; म्हणाले, हवा...

लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानतंर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेतली.

Rahul Gandhi News Updates
Rahul Gandhi Latest News
Rahul Gandhi defamation case
Rahul Gandhi protest
Rahul Gandhi disqualified 
Rahul Gandhi MP Status
Rahul Gandhi News Updates Rahul Gandhi Latest News Rahul Gandhi defamation case Rahul Gandhi protest Rahul Gandhi disqualified Rahul Gandhi MP Statusesakal
Updated on

नवी दिल्ली : लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानतंर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर राहुल गांधीं चांगलेच भडकले, त्यांनी थेट पत्रकारांवर आरोप करत तुम्ही स्वतःला पत्रकार का म्हणवता? असा प्रश्न केला. (Rahul Gandhi disqualified he angry on Journalist who question asked about Modi surname case)

पत्रकार परिषदेत एका पत्रकारानं त्यांना प्रश्न विचारला की, कोर्टाचा जो निर्णय आला त्यावरुन तुम्ही ओबीसींचा अपमान केला असा प्रचार तुमच्याविरोधात करत आहे, यावर तुमची भूमिका काय? हा प्रश्न येताच राहुल गांधी भडकले ते म्हणाले, आत्ताच्या आता पत्रकारांनी तीन वेळा याबाबत प्रश्न विचारला. आपण इतकं थेटपणे भाजपसाठी का काम करता आहात. करत असाल तर ते देखील चर्चेद्वारे करा, जर तुम्हाला भाजपचं काम करायचं तर तसा भाजपचा बॅच छातीवर लावून फिरा. तेव्हा मी तुम्हाला आत्ता जसं उत्तर दिलं तसंच उत्तर देईन. आम्ही पत्रकार आहोत असं दाखवू नका....हवा निकल गई क्या?


Rahul Gandhi News Updates
Rahul Gandhi Latest News
Rahul Gandhi defamation case
Rahul Gandhi protest
Rahul Gandhi disqualified 
Rahul Gandhi MP Status
Rahul Gandhi: "वारंवार पत्र लिहिलं अन्...."; राहुल गांधींचा लोकसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप

दरम्यान, मोदी या आडनावावरुन टिप्पणी केल्यानं राहुल गांधींविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला होता. याच खटल्यात सूरतच्या जिल्हा कोर्टानं त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली. त्यानंतर खासदाराला कोर्टानं दोषी ठरवल्यानं आणि शिक्षा सुनावल्यानं कायद्यानुसार, लोकसभा सचिवालयानं राहुल गांधींची खासदारकी रद्द केली.


Rahul Gandhi News Updates
Rahul Gandhi Latest News
Rahul Gandhi defamation case
Rahul Gandhi protest
Rahul Gandhi disqualified 
Rahul Gandhi MP Status
Disqualification Act: राहुल गांधींना झटका बसल्यानंतर सुप्रीम कोर्टात कायद्याला आव्हान!

पण भाजपनं आता राहुल गांधींनी मोदी या ओबीसी समाजाचा अपमान केला आहे, त्यामुळं त्यांनी याप्रकरणी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी करत राहुल गांधींविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. याच भाजपच्या आंदोलनावरुन पत्रकारानं राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.