नवी दिल्ली : काँग्रेस हायकमांड आणि खासदार राहुल गांधी यांची आज सलग तिसऱ्या दिवशी ईडीकडून चौकशी सुरु आहे. कथित नॅशनल हेरॉल्ड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं त्यांना काही दिवसांपूर्वीच समन्स बजावलं होतं. दरम्यान, राहुल गांधींची चौकशी सुडभावनेतून केली जात असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीत आंदोलन छेडलं आहे. आज तर हे कार्यकर्ते हिंसक झाले आणि काही जणांनी टायर जाळून निषेध नोंदवला. (Rahul Gandhi ED interrogation on third day Violent agitation of Congress in Delhi)
राहुल गांधी यांची काल आणि परवा सुमारे ९ तास चौकशी झाली होती. त्यानंतर आज तिसऱ्या दिवशी त्यांना पुन्हा चौकशीसाठी पाचारण करण्यात आलं आहे. आजही सकाळी राहुल गांधी यांना ईडीनं चौकशीसाठी बोलावलं अद्यापही त्यांची चौकशी सुरुच आहे. दरम्यान, काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या असून दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयात धरणं आंदोलनाला ते बसले आहेत.
दरम्यान, राहुल गांधींची सातत्यानं ईडीकडून चौकशी सुरु असल्यानं काँग्रेस नेते आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल खूपच नाराज झाले आहेत. त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, देशाच्या प्रत्येक मुद्यावर राहुल गांधीनी आवाज उठवला आहे. त्यामुळं त्यांना त्रास दिला जात आहे. पहिल्यांदाच असं घडतंय की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या कार्यालयात जाऊ दिलं जात नाहीए. कारण या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडलं आहे. काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर बॅरिकेट्सची मोडतोड केली तसेच टायरही जाळण्यात आला. अशा प्रकारच्या काही अनुचित घटना घडू नयेत म्हणून ईडीच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
सुब्रमण्यम स्वामींनी दाखल केला होता खटला
सन २०१२ मध्ये भाजपचे नेते आणि देशातील प्रसिद्ध वकील सुब्रमण्यम स्वामी यांनी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधी, मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस, पत्रकार सुमन दुबे आणि टेक्नोक्रेट सॅम पित्रोडा यांच्याविरोधात खटला दखल केला होता. त्यावेळी केंद्रात काँग्रेसप्रणित युपीए सरकार होतं. सुब्रमण्यम स्वामी यांनी दावा केला की, YILने (यंग इंडिया लिमिटेडने) २००० कोटी रुपयांहून अधिक संपत्ती आणि लाभ मिळवण्यासाठी चुकीच्या मार्गाने बंद पडलेल्या नॅशनल हेरॉल्ड या वर्तमान पत्राची मालमत्ता हडप केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.