Rahul Gandhi : "मी तुमच्यासाठी अनोळखी होतो अन् तरीही तुम्ही..."; राहुल गांधींचे भावनिक पत्र

Rahul Gandhi emotional letter: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी घोषणा केली की प्रियांका गांधी वाड्रा वायनाडमधून निवडणूक लढवतील. त्यांनी सांगितले की राहुल गांधी रायबरेलीच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतील आणि वायनाडच्या लोकांना प्रियांका गांधींच्या रूपाने एक सक्षम प्रतिनिधी मिळेल
Rahul Gandhi emotional letter to the people of Wayanad
Rahul Gandhi emotional letter to the people of Wayanad esakal
Updated on

नवी दिल्ली: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांना एक भावनिक पत्र लिहिले असून त्यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघ सोडून रायबरेलीचे प्रतिनिधित्व करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांची बहीण प्रियांका गांधी वाड्रा आता वायनाडमधून निवडणूक लढवणार आहेत. राहुल गांधी यांनी त्यांच्या पत्रात वायनाडच्या लोकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

त्यांनी म्हटले आहे, "वायनाडचे लोक मला नेहमीच प्रेम आणि पाठिंबा दिला आहे. मी नेहमीच त्यांचे आभार मानतो. मी तुम्हाला वचन देतो की मी तुम्हाला कधीही विसरणार नाही आणि तुमच्यासाठी काम करत राहीन"

Rahul Gandhi emotional letter to the people of Wayanad
Rahul Gandhi News: वायनाड सोडून राहुल गांधींनी रायबरेलीच का निवडलं? जाणून घ्या ५ कारणं...

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी घोषणा केली की प्रियांका गांधी वाड्रा वायनाडमधून निवडणूक लढवतील. त्यांनी सांगितले की राहुल गांधी रायबरेलीच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतील आणि वायनाडच्या लोकांना प्रियांका गांधींच्या रूपाने एक सक्षम प्रतिनिधी मिळेल

प्रियांका गांधी यांनी देखील वायनाडच्या लोकांना आश्वासन दिले आहे की त्या राहुल गांधींची गैरहजेरी जाणवू देणार​ नाहीत प्रकारे करतील. "मी वायनाडच्या लोकांची सेवा करण्यासाठी उत्सुक आहे आणि मी माझ्या भावासोबत रायबरेली आणि वायनाड दोन्ही ठिकाणी कार्यरत राहीन", असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

राहुल गांधी यांचे हे पत्र आणि निर्णय वायनाडच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांचा हा भावनिक आणि आत्मीयतेचा निर्णय त्यांच्या लोकांप्रती असलेल्या प्रेमाचा आणि कृतज्ञतेचा प्रत्यय देतो, अशी चर्चा काँग्रेसच्या गोटात रंगली आहे.

राहुल गांधी म्हणाले, मी तुम्हाला पाच वर्षांपूर्वी भेटलो होतो. पहिल्यांदा भेटायला आल्यावर मी तुमचा आधार मागितला. मी तुमच्यासाठी अनोळखी होतो आणि तरीही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला. तुम्ही कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थन करता याने काही फरक पडत नाही, तुम्ही कोणत्या समुदायाचे आहात किंवा तुम्ही कोणत्या धर्माचे अनुसरण करता किंवा तुम्ही कोणती भाषा बोलता याने काही फरक पडत नाही.”

"माझी बहीण प्रियांका तिथे तुमचे प्रतिनिधित्व करेल. मला विश्वास आहे की जर तुम्ही तिला संधी दिली तर ती तुमची खासदार म्हणून उत्कृष्ट कामगिरी करेल. तुमची आणि रायबरेलीच्या जनतेशी माझी मुख्य बांधिलकी आहे की आम्ही देशात पसरत असलेल्या द्वेष आणि हिंसाचाराशी लढू आणि पराभूत करू," असे राहुल गांधी म्हणाले. 

Rahul Gandhi emotional letter to the people of Wayanad
Pune Drugs Case: पुण्यात ड्रग्जच्या वाढत्या विळख्याला जबाबदार कोण? मुरलीधर मोहोळ काय म्हणाले? पोलिसांचे निलंबन होणार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.