नवी दिल्ली : ‘‘एक अशी व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे जेथे लोकांना त्यांच्या कौशल्याचा योग्य असा मोबदला मिळेल आणि त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना सन्मानही मिळेल,’’ असे मत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे. राहुल गांधी यांनी शुक्रवारी समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.