Rahul Gandhi Gets Bail: सुरत कोर्टातून जामीन मिळाल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Rahul Gandhi News
Rahul Gandhi Newssakal
Updated on

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना सोमवारी (३ एप्रिल) मानहानीच्या प्रकरणात जामीन मिळाला. सुरत कोर्टात त्याच्या अपीलवर पुढील सुनावणी 13 एप्रिलला होणार आहे. जामीन मिळाल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

"ही 'मित्रकाल' विरुद्ध लोकशाही वाचवण्याची लढाई आहे. या संघर्षात सत्य हेच माझे शस्त्र आहे आणि सत्य हेच माझे आश्रयस्थान आहे."

राहुल गांधींना सुरत कोर्टातून जामीन मिळाल्यानंतर काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले, "योद्धे विचलित होत नाहीत, एका क्षणासाठीही ते धीर खचत नाही, ते अडथळ्यांना मिठी मारतात, काट्यांमधून मार्ग काढतात." असे त्यांनी म्हटले आहे.

Rahul Gandhi News
Dream 11 Team : अवघ्या ४९ रुपयांत टीम बनवली,जिंकले दीड कोटी! ट्रक ड्रायव्हरचं 'ड्रीम' झालं पूर्ण
Rahul Gandhi News
Share Market : अनेक गुंतवणूकदार बनले कोट्यधीश! पुन्हा 'या' केमिकल कंपनीच्या शेअर्समध्ये तेजीचे संकेत

काँग्रेसचे नेते राहुल गांधी सोमवारी (३ एप्रिल) दुपारी बहीण प्रियंका गांधी यांच्यासोबत विमानाने सुरतला पोहोचले आणि त्यांनी न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील दाखल करण्यासाठी सत्र न्यायालयात रवाना झाले. याच्यासोबतच काँग्रेसशासित तीन राज्यांचे मुख्यमंत्री आणि अनेक ज्येष्ठ नेतेही न्यायालयात पोहोचले होते.

गेल्या महिन्यात सुरत तेथील ट्रायल कोर्टाने राहुल गांधींना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावाबद्दल आपल्या वक्तव्यानंतर राहुल गांधी यांनी ही शिक्षा सुनावण्यात आली. राहुल गांधी यांनी १३ एप्रिल २०१९ रोजी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कर्नाटकातील कोलार येथे एका सभेला संबोधित करताना हे वक्तव्य केले होते.

Rahul Gandhi News
Rahul Gandhi Granted Bail: सूरत कोर्टाचा राहुल गांधींना दिलासा! १३ एप्रिलपर्यंत जामीन वाढवला

राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर कोर्टात याविरोधात याचिका करण्यासाठी राहुल गांधी यांना ३० दिवसांचा वेळ देण्यात आला होता. तसेच सुरतच्या कोर्टानो दोषी ठरवल्यानंतर लोकसभा सचिवालयाने २४ मार्च रोजी एक अधिसुचना जारी करत राहुल गांधी यांची संसदेची सदस्यता रद्द केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.