Defamation case against Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना झारखंड हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. २०१८ मध्ये अमित शाह यांच्या विरोधात टिप्पणी केल्याप्रकरणात कोर्टाने निर्णय देताना राहुल गांधी यांची याचिका फेटाळून लावली आहे. आता या प्रकरणात राहुल गांधी यांच्याविरोधात कनिष्ठ न्यायालयात खटला चालवला जाणार आहे. राहुल गांधी यांनी एमपी एमएलए कोर्टाने जारी केलेल्या समन्सविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ही याचिका कोर्टाने फेटाळून लावली आङे. मागील सुनावणीदरम्यान कोर्टाने आपला निर्णय ऱाखून ठेवला होता.
नेमकं प्रकरण काय आहे?
राहुल गांधी यांनी २०१ साली बेंगळुरू येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय मिश्रा यांनी राहुल गांधी विरोधात तक्रार दाखल केली होती.यानंतर त्यांच्यावरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राहुल गांधी यांनी ट्रायल कोर्टमध्ये सुरू असलेली कारवाही रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. १६ फेब्रुवारी रोजी राहुल गांधी यांच्याकडून लिखीत बाजू कोर्टात मांडण्यात आली होती. यानंतर जस्टिस अंबुज नाथ यांच्या खंडपीठाने निर्णय राखून ठेवला होता.
यापूर्वी मोदी अडनावाबद्दल अक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी सूरत कोर्टाने राहुल गांधी यांना शिक्षा सुनावली होती. त्याच आधारावर त्यांना लोकसभा सदस्यत्व देखील गमवावे लागले होते. मात्र नंतर सर्वोच्च न्यायालयाने या शिक्षेला स्थगिती दिली आणि त्यानंतर राहुल गांधीची सदस्यता पुन्हा बहाल करण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.