Rahul Gandhi LoP: राहुल गांधी कोणामुळे झाले विरोधी पक्षनेते? जाणून घ्या, पडद्यामागं काय घडलं

Siddaramaiah: विरोधी पक्षनेतेपदी गांधींच्या नियुक्तीचा निर्णय इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर लगेचच जाहीर करण्यात आला.
 Rahul Gandhi Leader of Opposition 18th Lok Sabha
Rahul Gandhi Leader of Opposition 18th Lok SabhaEsakal
Updated on

18व्या लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर विराजमान झाल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी अभिनंदन केले. त्याचबरोबर सिद्धरामय्या यांनी राहुल गांधी लोकसभेची विरोधी पक्षनेते कसे झाले याची पडद्यामागील गोष्टही सांगितली.

सिद्धरामय्या म्हणाले की, "नुकत्याच झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत मी राहुल गांधी यांना लोकसभेचे विरोधी पक्षनेते करावे असा प्रस्ताव मांडला होता आणि राहुल गांधींनी तो प्रस्ताव स्वीकारण्याचे आवाहन केले होते."

विरोधी पक्षनेतेपदी गांधींच्या नियुक्तीचा निर्णय इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर लगेचच जाहीर करण्यात आला. काल रात्री काँग्रेस अध्यक्ष एम मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक झाली होती.

"काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधींनी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावे, असा प्रस्ताव मी सुचवला होता आणि मांडला होता. भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सामना करण्यासाठी राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावे अशी विनंती केली होती. विरोधी पक्षनेते होत राहुल गांधी यांनी ही जबाबदारी स्वीकारणे देशाच्या हिताचे असल्याचे मत मी मांडले होते," असे सिद्धरामय्या म्हणाले.

 Rahul Gandhi Leader of Opposition 18th Lok Sabha
Viral Audio Clip: दारूचे दुकान लवकर बंद झाल्याची तक्रार, "खासदार म्हणाले दिल्लीतून पाठवू का"? ऑडिओ क्लिप व्हायरल

दरम्यान 18 व्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून आपल्या पहिल्या भाषणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी भाजपचे ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

आपल्या भाषणात राहुल गांधी म्हणाले की, "आम्हाला विश्वास आहे की विरोधकांना बोलायला देत आम्हाला भारतातील लोकांचे प्रतिनिधित्व करण्याची परवानगी देऊन, तुम्ही भारतीय संविधानाचे रक्षण करण्याचे तुमचे कर्तव्य पार पाडाल. मी तुमचे आणि निवडणुकीत विजयी झालेल्या सभागृहातील सर्व सदस्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करू इच्छितो."

 Rahul Gandhi Leader of Opposition 18th Lok Sabha
Rahul Gandhi : राहूल गांधींची विरोधी पक्ष नेतेपदी निवड, पांढऱ्या कुर्त्याने वेधले सर्वांचे लक्ष

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे 99 खासदार निवडून आल्याने लोकसभेला दहा वर्षांनी विरोधी पक्षनेता मिळाला. यावेळी राहुल गांधींनी वायनाड आणि रायबरेली या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांनी दोन्ही ठिकाणी विजय मिळवल्यानंतर वायनाड मदतारसंघातून लोकसभेचा राजीनामा दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.