Rahul Gandhi : गांधी भक्तांनी मोदींच्या अंधभक्तांप्रमाणे वागू नये; 'सामना'तून काँग्रेसलाच सुनावलं

मोदी चोर आहेत असं राहुल गांधी म्हणाले पण ते डरपोकसुद्धा आहेत हे पुन्हा सिद्ध झालं, असंही सामनातून म्हटलं आहे.
Rahul Gandhi News
Rahul Gandhi NewsSakal
Updated on

Rahul Gandhi News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी काल लोकसभा अध्यक्षांनी रद्द केली. पंतप्रधान मोदींच्या अवमानप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता सामनातून काँग्रेसला सुनावण्यात आलं आहे. अर्थात त्यांनी राहुल गांधींवर झालेल्या कारवाईवरुन भाजपावर आसूडही ओढले आहेत.

काँग्रेस राहुल गांधींची (Rahul Gandhi Disqualification News) तुलना सावरकरांशी करत असल्यावरुन सामनाने ही टीका केली आहे. सगळे मोदी चोर असतात का?असं विधान केल्यावर राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्यात आली. हे प्रकरण सूरत कोर्टात गेलं आणि कोर्टाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर कोर्टाने माफी मागण्याचा पर्यायही दिला होता. मात्र माफी मागायला राहुल गांधी सावरकर नाहीत, अशी भूमिका मांडल्यावर सामनातून काँग्रेसला सुनावलं आहे.

Rahul Gandhi News
Rahul Gandhi News: राहुल गांधींची खासदारकी रद्द होणं काँग्रेससाठी चांगली बातमीही ठरू शकते

सावरकरांनी माफी का मागितली याबद्दल सांगताना सामनात म्हटलं आहे, "राहुल गांधींनी माफी मागितली नाही व ते बेडरपणे शिक्षेला सामोरे गेले. माफी मागायला ते काही सावरकर नाही, असे काँग्रेसवाले म्हणतात. अर्थात असे अकलेचे तारे तोडणाऱ्यांनीदेखील ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सावरकरांना इंग्रज सरकारने दोन जन्मठेपेच्या शिक्षा ठोठावल्या अशा प्रकारची शिक्षा ठोठावली जाणारे ते एकमेव क्रांतिकारक होते."

"वीर सावरकरांना अंदमानच्या काळकोठडीत डांबलं आणि तिथून पुन्हा मायभूमीत परत येण्याची शक्यता नव्हती. राहुल गांधींना अपिलात जाण्याची आणि शिक्षेला स्थगिती देण्याची संधी कायद्याने मिळाली तशी सवलत सावरकरांसारख्या क्रांतिकारकांना त्यावेळी नव्हती. सावरकरांनी १० वर्षे काळेपाणी भोगल्यावर बाहेर पडण्याची धडपड सुरू केली व त्यांनी तशी धडपड करावी असं महात्मा गांधी सरदार पटेलांपासून सगळ्यांचंच म्हणणं होतं", असंही सामनात म्हटलं आहे.

Rahul Gandhi News
Rahul Gandhi News: "...नाहीतर ते म्हणतील मी तुमच्या पाठीला नाक पुसतोय"; गांधींनी घेतला विरोधकांचा धसका

"इंग्रजांनी सावरकरांना ५० वर्षांच्या काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली. ती ते एक खतरनाक क्रांतिकारक देशभक्त होते म्हणून. बलाढ्य इंग्रज सरकारला वीर सावरकरांचे भय वाटत होते. म्हणूनच त्यांना पन्नास वर्षांसाठी अंदमानच्या काळकोठडीत नेऊन ठेवलं. त्यामुळे गांधी(सध्याचे) भक्तांनी मोदींच्या अंधभक्तांप्रमाणे वागू नये", अशा शब्दांत सामनातून काँग्रेसला सुनावण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.