Rahul Gandhi: "राहुल गांधींना संसदेत बंद करून कानशिलात मारायला हवी होती", भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

MLA Bharath Shetty: "राहुल गांधी केरळला गेल्यावर धर्मनिरपेक्ष व्यक्ती बनतात आणि तामिळनाडूत ते नास्तिक असतात. जेव्हा ते गुजरातमध्ये येतात तेव्हा भगवान शिवाचे निस्सीम भक्त असतात."
Rahul Gandhi MLA Bharath Shetty
Rahul Gandhi MLA Bharath ShettyEsakal
Updated on

कर्नाटकचे भाजप आमदार भरत शेट्टी यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना त्यांच्या कथित हिंदुविरोधी वक्तव्यासाठी संसदेत कोंडून आणि त्यांना कानशिलात मारायला हवी होती, असे म्हणत मोठा वाद निर्माण केला आहे.

जर राहुल गांधी मंगळुरू शहरात आले तर आम्ही त्यांच्यासाठी अशीच व्यवस्था करू. संसदेच्या आत जोरदार कानशिलात मारल्यानंतर विरोधी पक्षनेते बरे होतील, असेही भरत शेट्टी म्हणाले.

ते म्हणाले की, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हातात भगवान शंकराचे चित्र होते. त्यांना माहित नाही की भगवान शंकराने तिसरा डोळा उघडला तर ते राख होतील. त्यांनी हिंदुविरोधी धोरण स्वीकारले आहे. यावरून ते एक वेडा माणूस असल्याचे स्पष्ट होते.

आमदार शेट्टींनी आरोपी केला की, "राहुल गांधी केरळला गेल्यावर धर्मनिरपेक्ष व्यक्ती बनतात आणि तामिळनाडूत ते नास्तिक असतात. जेव्हा ते गुजरातमध्ये येतात तेव्हा भगवान शिवाचे निस्सीम भक्त असतात."

Rahul Gandhi MLA Bharath Shetty
Jawaharlal Nehru Cow: किस्सा दोस्ती का! रशियाने नेहरूंना का गिफ्ट केली होती गाय? वाचा काय आहे प्रकरण

राहुल गांधी यांच्यावर टीका करताना आमदार शेट्टी पुढे म्हणाले की, "लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत केवळ 99 जागा मिळाल्यानंतर, राहुल गांधींना काहीतरी मोठे केल्यासारखे वाटत आहे.

"शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचा जन्म हिंदू समाजात झाला. जेव्हा गरज असेल तेव्हा आम्ही शस्त्रे बाहेर काढू. बदला कसा घ्यायचा हे आपल्याला चांगलेच माहीत आहे. संसदेत जोरदार कानशिलात मारल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी बरे होतील.”

Rahul Gandhi MLA Bharath Shetty
Video: अशा खोटारड्या लोकांना शिक्षा झालीच पाहिजे; 'हिंसक हिंदू' वक्तव्याप्रकरणी शंकराचार्यांचे राहुल गांधींना समर्थन

कर्नाटकचे भाजप आमदार भरत शेट्टी यांनी दावा केला की, "हिंदू धर्म आणि संस्थांचे रक्षण करणे हे भाजपचे कर्तव्य आहे. हिंदू आणि हिंदुत्व वेगळे असल्याचे काँग्रेसने सांगायला सुरुवात केली आहे. अशा नेत्यांमुळे हिंदूंना भविष्यात गंभीर संकटाला सामोरे जावे लागणार आहे. ते अशी परिस्थिती निर्माण करतील की हिंदू घराबाहेर पडू शकणार नाहीत."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.