Rahul Gandhi: "वारंवार पत्र लिहिलं अन्...."; राहुल गांधींचा लोकसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप

खासदारकी रद्द झाल्यानंतर पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी लोकसभा अध्यक्षांवरu आरोप केले आहेत.

Rahul Gandhi News Updates
Rahul Gandhi Latest News
Rahul Gandhi defamation case
Rahul Gandhi protest
Rahul Gandhi disqualified 
Rahul Gandhi MP Status
Rahul Gandhi News Updates Rahul Gandhi Latest News Rahul Gandhi defamation case Rahul Gandhi protest Rahul Gandhi disqualified Rahul Gandhi MP Statusesakal
Updated on

नवी दिल्ली : लोकसभा सचिवालयाकडून खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी लोकसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप केले आहेत. सभागृहातील गंभीर कृत्यांबाबत त्यांनी अनेकदा लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिल्याचं त्यांनी सांगितलं.

राहुल गांधी म्हणाले, "मी संसदेत मोदी आणि अदानींच्या नात्याबाबत प्रश्न विचारला होता. त्यांचं नातं हे खूप जून आहे. त्यानंतर माझं भाषण बंद करण्यात आलं. त्यानंतर मी लोकसभा अध्यक्षांना यासंदर्भातील डिटेल रिपोर्ट पाठवला, पण लोकसभा अध्यक्षांनी या पत्राला उत्तर दिलं नाही. त्याचबरोबर मंत्री माझ्याबाबत संसदेत खोटं बोलले. त्यांनी सभागृहात सांगितलं की मी परदेशात खोटं बोललो. त्यावर मी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं पण त्या पत्राचंही उत्तर आलं नाही. त्यानंतर यासंदर्भात मी आणखी एक पत्र लिहिलं पण त्याचंही उत्तर आलं नाही. त्यानंतर मी अध्यक्षांच्या चेंबरमध्ये गेलो आणि मला नियमानुसार बोलू दिलं जात नसल्याचं सांगितलं. यावर अध्यक्षांनी हसत म्हणाले मी काहीही करु शकत नाही. त्यानंतर काय घडलंय हे आपण सर्वच जाणता आहात"


Rahul Gandhi News Updates
Rahul Gandhi Latest News
Rahul Gandhi defamation case
Rahul Gandhi protest
Rahul Gandhi disqualified 
Rahul Gandhi MP Status
Budget Session 2023: राहुल गांधींवरील कारवाईविरोधात विधानसभेच्या पायऱ्यांवर मूक आंदोलन

मी अनेकदा सांगितलं आहे की, लोकशाहीवर या देशात हल्ला होत आहे. प्रत्येक दिवशी आपण याचं उदाहरण पाहतो आहे. मी संसदेत पंतप्रधान मोदी आणि गौतम अदानी यांच्या नात्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. पण माझा आवाज दाबण्यात आला. त्यामळं मी विचारलेले प्रश्न आणि मुद्दे सभागृहातील कामकाजाच्या रेकॉर्डवर नाही, असंही यावेळी राहुल गांधी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.