Rahul Gandhi :कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर राहुल गांधी थेट लालूप्रसाद यादव यांच्या भेटीला, राजकीय हालचालींना वेग

Rahul Gandhi Politics:राहुल गांधी यांच्या राजकीय हालचालींना वेग, लालूप्रसाद यांची भेट घेण्यासाठी दिल्ली येथील निवासस्थानी दाखल.
Rahul Gandhi :कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर राहुल गांधी थेट लालूप्रसाद यादव यांच्या भेटीला, राजकीय हालचालींना वेग
Updated on

Rahul Gandhi meets Lalu Prasad Yadav: कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना मोदी आडनावाबद्दल केलेल्या वक्तव्यावर दाखल केलेल्या खटल्यात त्यांना २ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. ज्यानंतर त्यांना या शिक्षेवर सुप्रिम कोर्टाकडून दिलासा मिळाला. कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांना भेटण्यासाठी त्यांच्या दिल्ली येथील निवास्थानी पोहोचले.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही नेते रात्रीच्या जेवणावेळी भेटू शकतात. यावेळी लालूप्रसाद यादव यांचा मुलगा आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे देखील उपस्थित राहणार आहेत. नेत्यांची ही बैठक राजद खासदार आणि लालू प्रसाद यादव यांची मोठी मुलगी मीसा भारती यांच्या पंडारा पार्क येथील घरी होणार आहे. या भेटीमध्ये सध्याच्या राजकारणावर चर्चा केली जाईल.

सुप्रिम कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर राहुल गांधी यांच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे . त्यांनी सर्वात आधी कॉंग्रेस मुख्यालयातील कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि तमिळनाडूतील पक्षाच्या नेत्यांशी महत्वाची चर्चा केली. यावेळी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे देखील उपस्थित होते.

संध्याकाळी राहुल गांधी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची भेट घेतली. या भेटीत ते युतीच्या नावावर देखील चर्चा करु शकतात. असंही बोलले जातयं की लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांच्यात होणाऱ्या बैठकीत बिहारमधील मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होऊ शकते.

Rahul Gandhi :कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर राहुल गांधी थेट लालूप्रसाद यादव यांच्या भेटीला, राजकीय हालचालींना वेग
INDIA : 'इंडिया' आघाडीच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीची तारीख ठरली; समन्वय समितीमध्ये ठाकरेंचा समावेश होणार का?

या नेत्यांची ही बैठक मुंबईमध्ये होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीच्या आधी होत आहे, त्यामुळे महत्वाची मानली जात आहे. आधी ही बैठक ऑगस्टमध्ये होणार होती,पण आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. अजून कोणतीही तारीख ठरवण्यात आलेली नाही.

या बैठकीचं आयोजन राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) करणार आहे. इंडिया युती झाल्यानंतर ही पहिली वेळ आहे, जेव्हा सर्व सदस्य पक्ष एखाद्या अशा राज्यात बैठक घेत आहेत,ज्या राज्यात त्यांच्या सदस्य पक्षाची सत्ता नाही.

Rahul Gandhi :कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर राहुल गांधी थेट लालूप्रसाद यादव यांच्या भेटीला, राजकीय हालचालींना वेग
Nitin Chandrakant Desai Funeral : बॉलीवूडचा 'विश्वकर्मा' अनंतात विलीन! नितीन देसाई यांना अखेरचा निरोप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.