Rahul Gandhi On Nehru : नेहरू त्यांच्या नावामुळे ओळखले जात नाहीत, तर....! ; राहुल गांधींनी केली केंद्र सरकारवर टीका

Rahul Gandhi
Rahul Gandhi Esakal
Updated on

Rahul Gandhi On Nehru : केंद्र सरकारने नेहरू मेमोरियलचे नाव बदलले आहे. आता NMML चे नाव बदलून PM Museum and Library (PMML) करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनी नाव बदलण्याची औपचारिकता करण्यात आली. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे काँग्रेस पक्ष चांगलाच संतापला आहे.

नेहरू त्यांच्या नावामुळे ओळखले जात नाहीत, तर त्यांच्या कामामुळे ओळखले जातात, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Rahul Gandhi
Shinde Vs Bjp : भाजप - शिंदे गटाचा वाद चिघळला ; आमदार आणि शहरप्रमुखांनी ग्रुप वर काढले एकमेकांचे वाभाडे !

काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी नेहरू स्मारकाच्या नामंताविषयी बोलतांना टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले कि, 'त्यांना नाव बदलून इतर पंतप्रधानांचे नाव द्यायचे नाहीये उलट त्यांना केवळ नेहेरुंचे नाव दाबायचे आहे.

Rahul Gandhi
Narendra Modi: पंतप्रधान मोदी संपवणार भाजपमधली घराणेशाही; लोकसभेसाठी 'अ‍ॅक्शन प्लॅन'रेडी?

पुढे बोलतांना काँग्रेस नेते संदीप दीक्षित म्हणाले की, एकीकडे सरकार पंतप्रधानांचे आलिशान निवासस्थान बांधत आहे. तर एक आलिशान पंतप्रधान संग्रहालय बांधता आले असते. मात्र नेहरू मेमोरियल फंडाने काम चांगले हे माहित असतांनाही नाव बदलण्यात आले आहे.

Rahul Gandhi
Narendra Modi: पंतप्रधान मोदी संपवणार भाजपमधली घराणेशाही; लोकसभेसाठी 'अ‍ॅक्शन प्लॅन'रेडी?

'नेहरूंनी 17 वर्षात केलेल्या कामाची तुलना इतर पंतप्रधानांच्या तुलनेत होऊ शकत नाही. म्हणूनच ते खूप हुशार आहेत. नेहरूंचे क्रांतिकारक कार्य संग्रहालयात दिसत नाही.असेही दीक्षित म्हणाले.

Rahul Gandhi
Jalgaon News : ‘तापी’त उडी घेत डॉक्टरची आत्महत्या; चर्चा मात्र ‘सुसाईड नोट’ची

काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले होते कि, मोदींमध्ये प्रचंड भीती, अडचण आणि असुरक्षितता आहे. विशेषत: भारताचे पहिले आणि प्रदीर्घ पंतप्रधान नेहरू यांचा विचार केला तर या गोष्टी स्पष्टपणे दिसून येते. भाजप सरकारचा एकमेव अजेंडा आहे. नेहरू आणि नेहरूवादी वारसा नाकारणे, बदनामी करणे आणि हानी पोहोचवणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.