No Confidence Motion: लोकसभेत घुमणार राहुल गांधींचा आवाज, मणिपूर मुद्दयावर मोदींना विचारणार जाब

No Confidence Motion: लोकसभेत घुमणार राहुल गांधींचा आवाज, मणिपूर मुद्दयावर मोदींना विचारणार जाब
Updated on

No Confidence Motion: मोदी सरकारविरोधात विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर आजपासून लोकसभेत चर्चा सुरू होऊ शकते. 8 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट दरम्यान या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व बहाल केल्यानंतर ते आज पहिल्यांदा बोलणार आहेत. त्यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्या भाषणाकडे लागले आहे.

सरकारविरोधातील या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी पक्षाच्या वतीने प्रमुख वक्त्याची भूमिका बजावावी, अशी काँग्रेसची इच्छा आहे. 26 जुलै रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव स्वीकारला. 10 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देतील अशी अपेक्षा आहे.

यापूर्वी काँग्रेस नेत्याने मणिपूरमध्ये भेट दिली होती. त्यामुळे हिंसाचारावर राहुल गांधी संसदेत काय बोलतात हे पाहणे महत्वाचे ठरेल. 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारविरुद्धच्या पहिल्या अविश्वास प्रस्तावादरम्यान झालेल्या चर्चेत राहुल गांधी चांगलेच चर्चेत आले होते. त्यांनी नरेंद्र मोदी यांनी मिठी मारली होती  आणि डोळे मिचकावले होते.

No Confidence Motion: लोकसभेत घुमणार राहुल गांधींचा आवाज, मणिपूर मुद्दयावर मोदींना विचारणार जाब
Raghav Chadha News : राघव चड्ढांच्या अडचणीत वाढ! राज्यसभेच्या ५ खासदारांकडून हक्कभंग प्रस्तावाची मागणी; काय आहे प्रकरण?

'मोदी आडनाव' टिप्पणीवरून झालेल्या मानहानीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना दिलासा दिल्यानंतर लोकसभेतून त्यांची अपात्रता मागे घेण्यात आली.

काँग्रेसने आणलेला अविश्वास प्रस्ताव 26 जुलै रोजी गौरव गोगोई यांनी लोकसभेत दाखल केला , कारण विरोधकांची इच्छा होती की पंतप्रधानांनी मणिपूरचा मुद्दा संसदेत मांडावा. त्यामुळे मणिपूर मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणार का, याकडे विरोधकांचे लक्ष होते.

लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीने अविश्वास प्रस्तावावर चर्चेसाठी तीन दिवस दिले आहेत. पंतप्रधान मोदी गुरुवारी (10 ऑगस्ट) या प्रस्तावाला उत्तर देणार आहेत.

No Confidence Motion: लोकसभेत घुमणार राहुल गांधींचा आवाज, मणिपूर मुद्दयावर मोदींना विचारणार जाब
Deepak Sawant: माजी आरोग्यमंत्री दिपक सावंत यांना शासनाकडून राज्यमंत्री पदाचा दर्जा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.