Rahul Gandhi : खासदारकी गमावल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच वायनाड दौऱ्यावर; काय आहे कारण?

राहुल गांधी त्यांचा लोकसभा मतदारसंघ वायनाडमधील जनतेशी संवाद साधणार आहेत.
Rahul Gandhi
Rahul GandhiSakal
Updated on
Summary

राहुल गांधींचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. कारण, आता त्यांचं सदस्यत्व रद्द झालं आहे.

मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर आणि संसदेचं सदस्यत्व गमावल्यानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) पहिल्यांदाच त्यांचा संसदीय मतदारसंघ वायनाडला (Wayanad Constituency) भेट देत आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधीही असणार आहेत.

राहुल गांधी त्यांचा लोकसभा मतदारसंघ वायनाडमधील जनतेशी संवाद साधणार आहेत. शिवाय, ते कल्पेटा इथं रोड शो करणार असून त्यानंतर ते मीडियाशी बोलणार आहेत. त्यांच्या जाहीर सभेला हजारो लोक येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

राहुल गांधींनी वायनाडमधूनच 2019 ची लोकसभा निवडणूक जिंकली होती. दुसरीकडं अमेठीच्या जुन्या जागेवरून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. राहुल गांधींनी वायनाडमध्ये 4.31 लाख मतांनी विजय मिळवला होता.

Rahul Gandhi
Rajasthan : आपल्याच सरकारविरुध्द उपसलं उपोषणाचं हत्यार; पायलट 'हनुमानां'चा सल्ला पाळणार?

वृत्तानुसार, राहुल गांधींसोबत एआयसीसीचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, तारिक अन्वर, विरोधी पक्षनेते व्हीडी सतीसन, केरळ काँग्रेसचे अध्यक्ष के सुधाकरन, मुस्लिम लीगचे प्रदेशाध्यक्ष पनाक्कड सादिक अली शिहाब आणि इतर अनेक ज्येष्ठ नेतेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Rahul Gandhi
Afghanistan Women : आधी शिक्षणावर, आता 'या' ठिकाणी जाण्यास महिलांवर बंदी; तालिबान सरकारचा मोठा फतवा

'सत्यमेव जयते रॅली'

राहुल गांधींच्या रोड शो'ची खास गोष्ट म्हणजे, त्यांच्या हातात पक्षाच्या झेंड्याऐवजी तिरंगा असणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेत्यांनीही असाच मोर्चा काढला होता. हातात तिरंगा घेऊन नेत्यांनी विजय चौक ते कॉन्स्टिट्यूशन क्लबपर्यंत पदयात्रा काढली. यामध्ये 19 संघटना सहभागी झाल्या होत्या.

Rahul Gandhi
Nirmala Sitharaman: मुस्लिमांबाबत अर्थमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; सीतारामन म्हणाल्या, मुस्लिमांची स्थिती पाकिस्तानपेक्षा..

राहुल गांधींच्या दौऱ्याचं महत्त्व काय?

राहुल गांधींचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. कारण, आता त्यांचं सदस्यत्व रद्द झालं आहे. अशा स्थितीत राहुल गांधींना न्यायालयाकडून दिलासा मिळेल, अशी पूर्ण आशा या दौऱ्यातून स्पष्ट होत आहे. यापूर्वी राहुल गांधी यांनी वरिष्ठ नेत्यांसोबत सुरत गाठून आपल्या शिक्षेविरोधात दाद मागितली होती. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 मे रोजी होणार आहे. या प्रकरणी राहुल गांधींना जामीन मंजूर झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.