नवी दिल्ली : अमेरिकेची शॉर्ट सेलर संस्था हिंडेनबर्गच्या ताज्या अहवालावरून रण उठलेले असतानाच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘सेबी’च्या कारभाराच्या अनुषंगाने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘सेबी’च्या अध्यक्षा माधवी पुरी-बुच यांनी अजूनपर्यंत राजीनामा का दिला नाही?, सर्वोच्च न्यायालय स्वतःहून या प्रकरणाची दखल घेत चौकशी करणार आहे का? अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली.