Rahul Gandhi: राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा; 'या' नेत्याने केली मागणी

Latest Political News: . या शिबिरात एडीप योजनेंतर्गत अपंग लाभार्थ्यांना विविध सहाय्यक उपकरणांचे वितरण करण्यात आले.
congress rahul gandhi america usa visit politics
congress rahul gandhi sakal
Updated on

Latest Maharasthra News: केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी डहाणू विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी परदेशात जाऊन देशाबद्दल केलेल्या अपमानजनक वक्तव्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे.

त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, अशा कृतीमुळे राहुल गांधींच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उभे राहते, त्यामुळे त्यांच्या पासपोर्ट रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

रामदास आठवले डहाणू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सामाजिक सक्षमीकरण शिबिराच्या निमित्ताने आले होते. या शिबिरात एडीप योजनेंतर्गत अपंग लाभार्थ्यांना विविध सहाय्यक उपकरणांचे वितरण करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.