सूरत : बदनामीच्या खटल्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानं राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली आहे. यापार्श्वभूमीवर त्यांनी कोर्टाच्या या निर्णयाविरोधात अपील करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ते आजच सूरत जिल्हा कोर्टात दाखल होणार आहेत. यापार्श्वभूमीवर काँग्रेसनं जोरदार शक्तीप्रदर्शन केलं असून कोर्टाच्या बाहेर राहुल गांधींचे पोस्टर्स लागले आहेत. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. (Rahul Gandhi posters outside Surat court by youth congress due to Rahul Gandhi Visit)
सूरत कोर्टाच्या बाहेर लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर राहुल गांधींसह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचाही फोटो आहे. तसेच या पोर्स्टर्सवर फोटोंसह 'डरो मत', 'सत्यमेव जयते' असंही लिहिण्यात आलं आहे. युवक काँग्रेसच्यावतीनं ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे.
दरम्यान, राहुल गांधी सूरत कोर्टाकडं जाण्यासाठी रवाना झाले आहेत. दुपारी तीन वाजेपर्यंत ते कोर्टात दाखल होणार आहेत. सूरत कोर्टानं त्यांना बदनामीच्या फौजदारी गुन्ह्यात दोषी ठरवलं आहे. 'मोदी' या आडनावावरुन टीका केल्यानं त्यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला होता.
राहुल गांधींनी नक्की काय म्हटलं होतं?
सन २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या काळात कर्नाटकमध्ये राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरुन पंतप्रधानांवर निशाणा साधला होता. नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी सर्वांची आडनावे एक समान कशी? सर्व चोरांची नावे मोदीच का असतात? असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता. यावरुन मोठं वादंग निर्माण झालं होतं. यानंतर राहुल गांधींविरोधात गुजरातमधील भाजपचे आमदार पुर्नेश मोदी यांनी गुजरातच्या कोर्टात खटला दाखल केला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.