मुख्यमंत्री म्हणतात, 'राजीव गांधींच तुमचे वडील आहेत याचा पुरावा काय?'

Rahul Gandhi CEO
Rahul Gandhi CEOSakal
Updated on

नवी दिल्ली: सध्या पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. प्रचार अत्यंत शिगेला पोहोचला असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबाबत केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेचं कारण ठरलं आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी आधीपासूनच प्रसिद्ध आहेत. त्यांनी आज उत्तराखंडमधील प्रचारसभेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागण्याच्या मुद्द्यावरून टीका केली आहे. (Assam CM HB Sarma in U'khand)

Rahul Gandhi CEO
देशात कॅन्सरचे किती रुग्ण? संसदेत आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

ही टीका करताना त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचाही उल्लेख केला आहे. हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटलंय की, "जनरल बिपीन रावत आपल्या उत्तराखंड आणि देशाचे गौरव होते. त्यांच्या नेतृत्वात आपल्या भारतानं पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. मात्र, राहुल गांधींनी काय विचारलं, पुरावे द्या. तुम्ही कुठल्या वडिलांचे पुत्र आहात, याचे पुरावे आम्ही कधी मागितले आहेत का?" असा प्रश्न सरमा यांनी विचारला. ही टीका करताना त्यांनी थेट माजी पंतप्रधान आणि राहुल गांधींचे वडील राजीव गांधी यांचा उल्लेख केला आहे. सोशल मीडियावरून अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केलीय.

Rahul Gandhi CEO
कोरोना संपल्याची घोषणा, अंदाज करु नका; WHOने पिळले कान

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, "आमच्या सैनिकाकडून पुरावे मागण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? जर लष्करानं सांगितलं आहे की, पाकिस्तानात बॉम्ब फोडला, तर फोडला आहे. त्यावर पुन्हा का बोलायचं आहे तुम्हाला? मी कधी पुरावे मागितले आहेत का, की तुम्ही खरंच राजीव गांधींचे पुत्र आहात का? मग तुम्हीही आमच्या सैनिकांचा अपमान करू नका," असंही हिमंता बिस्वा सरमा म्हणाले आहेत.

विशेष म्हणजे हिमंता बिस्वा सरमा हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत. आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. सध्या ते आसामचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.