काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सोमवारी अचानक आपले जुने सहकारी भाजपा खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांची आठवण आली. यावेळी शिंदे यांच्यावर भाष्य करताना राहुल गांधी म्हणाले, शिंदे काँग्रेसमध्ये असते तर एक दिवस मुख्यमंत्री झाले असते मात्र भाजपामध्ये ते बॅकबेंचर बनले आहेत. शिंदे यांनी गेल्या वर्षी मार्च महिन्यात काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता.
एएनआयच्या वृत्तानुसार, युथ काँग्रेसच्या एका बैठकीत बोलताना राहुल गांधी म्हणाले, "ते (शिंदे) जर काँग्रेससोबत राहिले असते तर मुख्यमंत्री होऊ शकले असते, मात्र भाजपात ते बॅकबेंचर बनून राहिले आहेत. शिंदे यांच्याकडे काँग्रेससोबत काम करताना पक्षाला मजबूत करण्याचा पर्याय होता. मी त्यांना म्हटलं होतं की एक दिवस तुम्ही मुख्यमंत्री बनाल मात्र त्यांनी दुसरा मार्ग निवडला."
मनसुख हिरेन मृत्यूप्रकरण ATSकडेच; NIA करणार स्फोटकांसंबंधीचा तपास
सिंधिया भाजपात असताना कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत - राहुल गांधी
राहुल गांधी पुढे म्हणाले, मी तुम्हाला लिहून देतो की भाजपामध्ये ज्योतिरादित्य शिंदे कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत. त्यासाठी त्यांना पुन्हा इकडेच यावं लागेल. कार्यक्रमात राहुल गांधी यांनी पक्षाच्या तरुण कार्यकर्तांना आरएसएसच्या विचारधारेशी लढण्याचा आणि कोणालाही न घाबरण्याचा मंत्र दिला. पाच राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी यांनी युथ काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला संबोधित केले.
Batla House encounter : इन्स्पेक्टर मोहनचंद्र शर्मा हत्येप्रकरणी अरिझ खान दोषी; १५ मार्चला सुनावणार शिक्षा
काँग्रेस सोडताना शिंदे केला होता आरोप
दरम्यान, गेल्या वर्षी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे भाजपात दाखल झाले होते. भाजपात दाखल झाल्यानंतर शिंदे यांनी आरोप केला होता की, काँग्रेस पक्ष आता पहिल्यासारखा राहिला नाही. मध्य प्रदेशातील तत्कालिन कमलनाथ सरकारवर टीकास्त्र सोडताना शिंदे म्हणाले होते की, मध्य प्रदेश सरकारमध्ये ट्रान्सफर उद्योग सुरु आहे. नंतर भाजपाच्यावतीने त्यांना राज्यसभेवरही पाठवण्यात आलं. शिंदे समर्थक आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार कोसळलं त्यानंतर शिवराज सिंह चौहान पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.