Rahul Gandhi: 'ज्या गोष्टीसाठी मी 10 वर्ष शिव्या खाल्या...', अविश्वास ठरावाच्या चर्चेत राहुल गांधींना आठवली भारत जोडो यात्रा

मोदी देशाचा आवाज ऐकत नाहीत फक्त 2 लोकांचा आवाज ऐकतात म्हणत राहुल गांधींचा हल्लाबोल
Rahul Gandhi
Rahul GandhiEsakal
Updated on

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलायला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे. अविश्वास ठरावाच्या चर्चेवेळी राहुल गांधींना भारत जोडो यात्रा आठवली. त्यांनी भारत जोडो यात्रेतील काही आठवणी सांगितल्या आहेत.

यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले, 'मी काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यत गेलो. मी मोठी यात्रा केली. मला भारताला पाहायचे होते. लोकांमध्ये मला जायचे होते. त्यांना समजून घ्यायचे होते. काही गोष्टी मला समजल्या. ज्या गोष्टीचं मला प्रेम होतं ज्या गोष्टीसाठी मी मरायलाही तयार होतो, ज्या गोष्टींसाठी दहा वर्षे शिव्याही खाल्ल्या ती गोष्ट मला समजून घ्यायची होती. ती गोष्ट नेमकी काय होती.'

Rahul Gandhi
Sharad Pawar: 'मी पंतप्रधानांना सांगितलं भाजपवर विश्वास ठेवू नका...', शरद पवार यांचा गौप्यस्फोट

'ज्या गोष्टीनं मला हृदयामध्ये वेगळं नातं निर्माण केलं होतं, अशा गोष्टी मला जाणून घ्यायच्या होत्या. मी गेल्या काही वर्षांपासून दहा ते बारा किलोमीटर चालतो आहे. मी हे सगळं का केलं याचा विचार करतो आहे. माझ्या मनात अहंकार होता. मात्र भारत अहंकाराला संपवण्याचे काम करतो. दोन ते तीन दिवसांनी माझ्या गुडघ्यांमध्ये त्रास होण्यास सुरुवात झाली. माझे जूने दुखणे पुन्हा वाढले.'

'थोड्याच दिवसांत माझा अहंकार होता तो कमी झाला. मी भारताला ज्या अहंकाराच्या भावनेनं पाहायला निघालो होतो तो अचानक कमी झाला.'

Rahul Gandhi
PM मोदींना बॉम्बनं उडवून देऊ, देशात बॉम्बस्फोट घडवून आणू; पुण्यात एका व्यक्तीला ई-मेलवर धमकी आल्याने खळबळ

'मला वाटेत शेतकरी भेटले. मी त्यांच्याशी आपुलकीनं संवाद साधला. हजारो लोकं भेटली. त्यानंतर मला त्यांच्याशी बोलणं अशक्य होऊन गेलं. मला बोलता येत नव्हतं. एवढ्या लोकांशी कसं बोलायचं हा प्रश्न होता. खूप गर्दी होती. गर्दीतून सारखा भारत जोडो असा आवाज येत होता.'

Rahul Gandhi
Sana Khan: भाजप पदाधिकारी सना खान यांची हत्या! मृतदेह मध्य प्रदेशातील हिरन नदीत फेकला, एका आरोपीला अटक

'दररोज सकाळी सहा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यत वेगवेगळ्या स्तरातील लोकं मला भेटली. सगळ्यांचा आवाज मी ऐकलो. त्यात कामगार, व्यापारी, सगळे होते. हा प्रवास सुरु होता. मी सगळ्यांचे ऐकत होतो. आणि एक शेतकरी माझ्याजवळ आले. त्यांनी माझ्या हातात पगडी ठेवली. त्यांनी माझ्याकडे पाहत कापसाचा बंडल दिला. माझ्याकडे एवढेच शिल्लक राहिले आहे असंही सांगितलं आहे.'

'तुम्हाला विम्याचे पैसे मिळाले का असा प्रश्न मी त्यांना विचारला होता. त्यांनी मला पैसे मिळाले नाही असे सांगितले. भारतातल्या सगळ्यात मोठ्या उद्योगपतींनी तो पैसा माझ्याकडून हिसकावून घेतला. त्याच्या मनातील वेदना या माझ्यापर्यत पोहचत होत्या', असंही पुढे राहुल गांधी म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.