नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले, की ज्या प्रमाणे रशियाने युक्रेनवर हल्ला केला करून तेथील काही भागांवर आपला दावा केला आहे. त्या प्रमाणेच भारतविरुद्ध चीनही हल्ला करु शकतो. जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. रशिया (Russia) युक्रेनची सार्वभौमता मान्य करित नाही. डोनेत्सक आणि लुहान्सक हा भाग युक्रेनचा असल्याचे तो मान्यच करित नाही. या आधारावर रशियाने युक्रेनवर हल्ला केला. शेवटी त्याचा उद्देश काय आहे ? युक्रेन, नाटो आणि अमेरिकेची आघाडी रशियाला तोडू इच्छित आहे, असे राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले. हाच सिद्धांत चीन भारतावर लागू करु शकतो. हा देश म्हणतो, लडाख आणि अरुणाचल प्रदेश भारताचा हिस्सा नाही. (Rahul Gandhi Says, China Could Attack On India like Russia Does On Ukraine)
तसेच त्याने या प्रदेशाजवळ आपले सैन्य तैनात केले आहे. सरकार चीनच्या (China) या हलचालींकडे कानाडोळा करित आहे. मात्र आपल्याजवळ रशिया आणि युक्रेन एक माॅडल आहे. तो भारतात (India) लागू होऊ शकतो, असे भाकित त्यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, सरकार वास्तव स्वीकार करायला तयार नाही. मी त्यांना सांगू इच्छितो, की त्यांनी वास्तवाचा स्वीकार करावा आणि त्यानुसार तयारी सुरु करावी. जर आपण तयारी केली नाही, तर परिस्थिती बिघडू शकते आणि युद्धास आपण तोंड देऊ शकणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
श्रीलंकेबरोबर केली तुलना
राहुल गांधी यांनी भारतातील स्थितीची तुलना श्रीलंकेबरोबर केली. ते म्हणाले, गेल्या २ ते ३ वर्षांमध्ये प्रसारमाध्यमे, संस्था, भाजप (BJP) नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RRS) वास्तवावर पांघरुण घातले आहे. हुळहळू सत्य समोर येईल. आज जे श्रीलंकेत होत आहे, तेथील सत्य समोर आले आहे. भारतातही सत्य समोर येईल. शेवटी अंतर किती आहे, असा सवाल त्यांनी केला. भारताला वेगवेगळ्या समुदायात विभागण्यात आले आहे.
पूर्वी हा एक देश होता. मात्रा त्यांनी आता वेगवेगळे देश देशाच्या आता बनवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे, असा हल्लाबोल त्यांनी भाजप व संघावर केला. त्या सर्वांना एकमेकांसमोर उभे केले जात आहे. जेव्हा असे घडते तेव्हा हिंसा होते. भले आज माझ्यावर भरोसा केला जाणार नाही, मात्र २ ते ३ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर हे दिसायला लागेल, असे राहुल गांधी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.