Karnataka CM : शपथविधीच्या दोनच तासात होणार निवडणुकीतील आश्वासन पूर्ण! राहुल गांधीची धडाकेबाज घोषणा

rahul Gandhi says first cabinet meeting of the Karnataka govt 5 promises will become law congress 5 guarantees
rahul Gandhi says first cabinet meeting of the Karnataka govt 5 promises will become law congress 5 guarantees
Updated on

कर्नाटकाता काँग्रेसच सरकार स्थापन झालं आहे. मुख्यमंत्री सिध्दारामया तर उपमुख्यमंत्री पदा डीके शिवकुमार यांच्यासह ८ मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आहे. शपथग्रहन सोहळ्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यानी उपस्थित लोकांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी कर्नाटकच्या जनतेचे आभार मानले.

यासोबतच राहुल गांधी यांनी १ ते २ तासात कर्नाटकचे नव्या सरकारची पहिली कॅबिनेट मिटींग होईल आणि त्यामध्ये आम्ही जी पाच आश्वासन दिली आहेत ते कायदा बनतील असं सांगितलं. आम्ही जे बोलतो ते आम्ही करून दाखवतो.

राहुल गांधी म्हणले की, कर्नाटकात जनतेचे काँग्रेस पक्षाच्या वतीने धन्यावाद, तुम्ही पूर्णपणे काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला, मागील पाच वर्षांपासून तुम्हाला काय अडचणी आल्या हे तुम्हा आणि आम्ही देखील जाणतो. मीडियामध्ये देखील काँग्रेस का जिंकली ते सांगण्यात येत आहे. या विजयाचं कारण फक्त एक खारण आहेत आणि ते म्हणजे काँग्रेस पक्ष गरीब, दलित आणि मागासलेल्या नागरिकांसोबत उभा राहीला. आम्ही प्रेमाने द्वेशावर विजय मिळवला. द्वेषाच्या बाजारात कर्नाटकमध्ये प्रेमाचं दुकान उघडलं आहे.

rahul Gandhi says first cabinet meeting of the Karnataka govt 5 promises will become law congress 5 guarantees
Beed Crime News : संतापजनक प्रकाराने बीड हादरलं! विधवा महिलेवर ७ जणांकडून सामूहिक बलात्कार

पुढे बोलताना राहुल गांधी यांनी सांगितलं की, कर्नाटकमधील जनतेने भाजपच्या भ्रष्टाचाराला हरवलं आहे. ते म्हणाले की आम्ही खोटी आश्वासने दिली नव्हती. जे बोलतो ते करतो देखील. एक-दोन तासांत कर्नाटक सरकारची पहिली कॅबिनेट मिटींग होईल ज्यामध्ये आम्ही आश्वासन दिलेले पाच कायदे केले जातील.

ते पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही जे बोलतो ते आम्ही करतो. सरकारचं ध्येय शेतकरी, कामगार, लहान दुकानदार, तरुण यांची रक्षा आणि त्यांच्या भविष्यासाठी काम करणे हे आहे. कर्नाटकच्या नागरिकांनी काँग्रेसला ताकद दिली हे आम्ही कधीही विसरणार नाहीत. हे सरकार कर्नाटकच्या लोकांचे आहे. आम्ही मनापासून तुमच्यासाठी काम करू.

rahul Gandhi says first cabinet meeting of the Karnataka govt 5 promises will become law congress 5 guarantees
Pandharpur Accident : अंत्यविधी उरकून परतणाऱ्या गर्दीत घुसला ट्रक! तिघींचा जागीच मृत्यू, ६ गंभीर जखमी

काँग्रेस ही आश्वासने करणार पूर्ण

कर्नाटक निवडणूकीत मिळालेल्या विजयामागे पाच कलमी योजना असल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेसने कर्नाटक निवडणूकीत घोषणा केली होती की, जर त्यांचे सरकार आले थर कॅबिनेट बैठकीत पाच सुत्री योजना लागू केली जाईल. या अंतर्गत गृहज्योती , गृह लक्ष्मी, अनन्य भाग्य युवा निधी, शक्ती योजना यांचा समावेश आहे.

काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात गृह ज्योती योजने अंतर्गत कर्नाटकातील सर्व घरांमध्ये २०० यूनिट फ्री वीज देण्याची घोषणा केली आहे. तसेच गृह लक्ष्मी योजनेअंतर्गत पक्ष सगळ्या कुटुंबांतील महिला प्रमुखांना २००० हजार मासिक मदत देखील देण्याचं आश्वासन दिलं होतं. तसचे अन्ना भाग्य योजनेअंतर्गत बीपीएल कुटुंबांना दरमहा १० किलो धान्य देण्यात येईल अशी घोषणा देखील काँग्रेसने केली आहे.

यासोबतच बेरोजगार तरुणांना दोन वर्षांसाठी ३००० रुपये प्रतिमहिना आणि बेरोजगार डिप्लोमा धारकांना १५०० रुपये प्रतिमाह देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिलं आहे। याला युवानिधी योजना असे नाव देण्यात आले आहे. तर शक्ति योजनेअंतर्गत राज्य सर्व महिलांना कर्नाटक बसेसमध्ये KSRTC आणि BMTC च्या बसेसमध्ये मोफत प्रवास करण्याची सुविधा देण्यात येईल. काँग्रेसने त्यांच्या जाहिरनाम्यात सरकारी नोकरदारांना जुनी पेंशन योजना लागू करण्याचे देखील आश्वासन दिले आहे.

काँग्रेसने फेब्रुवारी महिन्यात हिमाचल प्रदेश मध्ये देखील विजय मिळवला होता. हिमाचल प्रदेश निवडणूकात देखील काँग्रेसने OPS लागू करण्याचे आश्वासन दिले होते. ज्याला लोकांकडून मोठ्या संख्येने स्वीकारलं गेलं.

कर्नाटकमध्ये देखील काँग्रेसने आरक्षणामध्ये ५० टक्के वाढ करून ७५ टक्के करणे आणि महिलांना फ्री बस सुविधा देण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेसने कर्नाटकच्या सरकारी विभागांमध्ये रिकामी पदे लवकरच भरण्याचे देखील आश्वासन दिले आहे. ज्यामध्ये ८० टक्के आरक्षण स्थानिक लोकांना दिले जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()