नवी दिल्ली : काँग्रेस नेता राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज शुक्रवारी हिंदूत्ववाद्यांवर मोठा प्रहार केला आहे. हिंदूत्ववाद्यांनी (Hindutvawadi) नेहमीच द्वेष आणि हिंसा (Hatred And Violence) पसरवली आहे आणि त्याची किंमत सर्व समुदायांना चुकवावी लागली आहे, असं त्यांनी म्हटलंय. राहुल गांधींनी पुढे म्हटलंय की, भारत हिंसेच्याव विरोधात आहे आणि असं परत व्हायला नको. त्यांचं हे ट्विट हरिद्वारमध्ये 17 ते 20 डिसेंबरपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या 'धर्म संसदेतील' हेट स्पीचच्या (Hate Speeches At Dharma Sansad) पार्श्वभूमीवर आलेलं आहे.
नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलंय की, हिंदुत्ववादी नेहमी द्वेषाचा प्रसार करतात त्याची मोठी किंमत हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिस्ती लोकांना चुकवावी लागते. पण आता आणखी हे होणार नाही. पुढे त्यांनी दोन हॅशटॅग जोडले आहेत #IndiaAgainstHindutva आणि #HaridwarHateAssembly असं त्यांनी म्हटलंय.
धर्म संसदेतील वक्त्यांवर पोलिसांकडून एफआयआर
अल्पसंख्याकांविरोधात चिथावणीखोर वक्तव्ये केल्याप्रकरणी वादात सापडलेल्या हरिद्वार येथे संपन्न झालेल्या धर्म संसदेतील वक्त्यांविरोधात कायदेशीर कारवाईचा फास आवळल्या जाऊ लागला आहे. जितेंद्र नारायण त्यागी आणि अन्य वक्त्यांविरोधात पोलिसांकडून ‘एफआयआर’ दाखल करण्यात आला आहे. त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी) यांनी याच महिन्यामध्ये मुस्लिम धर्माचा त्याग करत हिंदू धर्म स्वीकारला होता. या संसदेत सहभागी झालेल्या अन्य वक्त्यांनीही प्रक्षोभक वक्तव्ये केली होती, त्यांच्या भाषणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ निर्माण झाली होती. या सर्वांविरोधात हरिद्वार कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांवर दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
प्रियांका गांधींचीही कारवाईची मागणी
दरम्यान काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी- वद्रा यांनीही आज धर्म संसदेमध्ये चिथावणीखोर वक्तव्ये करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून या वक्त्यांनी राज्यघटना आणि कायद्याचा भंग केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते साकेत गोखले यांनीही आयोजकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.