Rahul Gandhi : जनतेची सेवा निष्ठेने : राहुल

वायनाडमध्ये अर्ज दाखल; प्रियांका गांधींची उपस्थिती
Rahul Gandhi : जनतेची सेवा निष्ठेने : राहुल
Rahul Gandhiesakal
Updated on

तिरुअनंतपुरम ः काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी त्यांनी गांधी यांच्यासह ‘रोड शो’ केला. आपण न्याय युगात प्रवेश करीत आहोत. मी पूर्ण निष्ठेने जनतेची सेवा करू इच्छितो, असे ते म्हणाले.

Rahul Gandhi : जनतेची सेवा निष्ठेने : राहुल
Dhule News : पीककर्जवाटपाची 90 टक्के वसुली; मार्चअखेरीस 305 कोटी 27 लाख 94 हजार रुपये पीककर्ज भरले

राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांचे मुप्पैनाड गावातील हेलिपॅडवर शेकडो कार्यकर्ते व समर्थकांनी स्वागत केले. सकाळी साडेअकरा वाजता त्यांचा रोड शो सुरू झाला. ‘रोड शो’मध्ये अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाळ, दीपा दास, कन्हैया कुमार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते के.व्ही.डी सतीशन आदी नेते सहभागी झाले.

Rahul Gandhi : जनतेची सेवा निष्ठेने : राहुल
Dhule News : पीककर्जवाटपाची 90 टक्के वसुली; मार्चअखेरीस 305 कोटी 27 लाख 94 हजार रुपये पीककर्ज भरले

‘रोड शो’मध्ये बोलताना ते म्हणाले ‘‘तुमचा खासदार असणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. केवळ मतदार म्हणून मी तुमच्याकडे पाहत नाही. माझ्या बहिणीबद्दल जसा विचार करतो आणि तिच्यासाठी जे काही करतो, तसाच विचार मी तुमचा करतो,’’ ‘‘ही निवडणूक लोकशाही आणि राज्यघटनेची लढाई आहे. एका बाजूला अशा शक्ती आहे, ज्या देशातील लोकशाही आणि राज्यघटना नष्ट करू पाहत आहे. दुसरीकडे एक अशी शक्ती आहे, की जी देशाची लोकशाही आणि राज्यघटना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. कोण कोणाच्या बाजूने आहे आणि कोण घटनेवर हल्ला करीत आहे, हे तुमच्यासमोर आहे,’’ असेही ते म्हणाले.

Rahul Gandhi : जनतेची सेवा निष्ठेने : राहुल
Dhule Crime News : नकली मतदान कार्ड बनविणारे अटकेत; ‘एलसीबी’ची धडक कारवाई

मानव-पशू संघर्षावरही भाष्य

राहुल गांधी यांनी केरळमधील मानव-पशू संघर्षाच्या मुद्द्यावरही ते म्हणाले की, राज्यात मानव-पशू संघर्षाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. या लढाईत मी वायनाडच्या नागरिकांबरोबर आहे. केरळमध्ये वैद्यकीय महाविद्यालय बांधण्यासाठी राज्य सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न मी केला. मुख्यमंत्र्यांना मी चिठ्ठी लिहिली होती; पण दुर्दैवाने पुढे काही झाले नाही. दिल्लीत आमचे सरकार स्थापन होईल याबद्दल मला विश्‍वास आहे आणि जेव्हा केरळमध्येही आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही या मुद्यांवर तोडगा काढू, असे आश्‍वासन त्यांनी दिले. राहुल यांनी वायनाडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.

तिरंगी लढत

वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपचे प्रदेशाध्यक्ष के.सुरेंद्रन आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या ॲनी राजा हे उमेदवार रिंगणात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.