काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल(सोमवारी) संसदेच्या अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर विरोधी पक्षनेते म्हणून पहिले भाषण केले. राहुल गांधी लोकसभेत बोलले तेव्हा बराच गदारोळ झाला आणि त्यांनी आपल्या ९० मिनिटांहून अधिक काळच्या भाषणात अनेक पंचलाईन मारल्या, मात्र त्यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात गदारोळ निर्माण झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांपासून ते संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्यापर्यंत सर्वांनीच त्यांची तक्रार केली. त्यानंतर मोठी कारवाई करत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींच्या भाषणातील अनेक भाग काढून टाकले आहेत.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी भाजप नेत्यांवर जातीय आधारावर लोकांमध्ये फूट पाडल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधींच्या या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाकडून कडाडून विरोध करण्यात आला. राहुल गांधींचे भाषण सुरू असताना खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच त्यांच्या जागेवरून उठावे लागले. हिंदू बाबत केलेल्या वक्तव्यावरून राहुल गांधींवर जोरदार हल्लबोल करण्यात आला त्याचबरोबर राहुल यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.
पंतप्रधान मोदींसह कॅबिनेट मंत्र्यांनी घेतला आक्षेप
पीएम मोदींनी राहुल गांधींच्या भाषणात दोनदा आक्षेप घेतला, याशिवाय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह आणि कृषी मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक मंत्र्यांनी राहुल यांच्यावर आक्षेप व्यक्त केला. गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधींना हिंदूंबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागायला सांगितली.
राहुल यांचे संसदेतील भाषण ९० मिनिटांपेक्षा जास्त होते, परंतु त्यांच्या भाषणाचा मोठा भाग संसदेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आला आहे. ही कारवाई देखील विशेष आहे कारण विरोधी पक्षनेते म्हणून त्यांचे हे पहिलेच भाषण होते.
हिंदू आणि हिंसेबाबत दिलेले विधान काढून टाकण्यात आले आहे.
मी जेव्हा पंतप्रधान मोदींकडे पाहतो तेव्हा ते हसत नाहीत, हे राहुल यांचे विधानही लोकसभेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आले.
अंबानी आणि अदानी यांच्याबाबत राहुल गांधींच्या वक्तव्यावरही कात्री लावण्यात आली आहे.
भाजप २४ तास द्वेष आणि हिंसाचार पसरवते. हे विधानही काढण्यात आले.
राहुल गांधींचे अग्निवीरबाबतचे विधान ज्यात त्यांनी अग्निवीर हा लष्कराचा नसून पीएमओचा प्लॅन असल्याचे म्हटले होते.
भाजपकडून अल्पसंख्याकांना अन्यायकारक वागणूक देण्याबाबत राहुल गांधी यांचे वक्तव्य काढून टाकण्यात आले.
कोटामधील संपूर्ण परीक्षा केंद्रीकृत आणि श्रीमंतांच्या फायद्यासाठी असल्याची राहुल गांधींची टिप्पणी काढून टाकण्यात आली.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर हिंसाचार पसरवल्याचा आरोप केला आहे. हे लोक हिंदू नसल्याचा दावा राहुल गांधींनी केला, त्यावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय मंत्र्यांनी सत्ताधारी पक्षाचा निषेध नोंदवला. तरुण, विद्यार्थी, शेतकरी, मजूर, दलित, महिला आणि अल्पसंख्याकांमध्ये भीती निर्माण करत असल्याचा आरोप राहुल गांधींनी भाजपवर केला होता.
संसदेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू, पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या व्यतिरिक्त त्यांनीही उभे राहून विरोध सुरू केला आणि त्यांचे आरोप निराधार असल्याचे म्हटले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.