Rahul Gandhi: अखेर राहुल गांधींच्या राजीनाम्याचं ठरलं ! ज्या मतदारसंघाने तारलं त्यालाच करणार टाटा बायबाय

Rahul Gandhi Wayanad: दरम्यान, यंदा लोकसभेत काँग्रेसचे 100 खासदार विजयी झाले आहेत. त्यामुळे काँग्रेस खासदारांनी राहुल यांनी विरोधी पक्षनेते व्हावे यासाठी आग्रह केला आहे.
Rahul Gandhi to resign from wayanad
Rahul Gandhi to resign from wayanadEsakal
Updated on

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वायनाड आणि रायबरेलीमधून निवडणूक जिंकलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाडमधून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसच्या कार्यकारीणीची अशोक हॉटेल येथे प्रथमच बैठक झाली. यामध्ये काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी आणि राहुल गांधी उपस्थित होते.

आज दिल्लीत काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार प्रथमच दिल्लीत आले आहेत. या सर्वांनी राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेते पदी निवड व्हावी यासाठी आग्रह धरला आहे.

दरम्यान पक्षाच्या कार्यकारीणीच्या बैठकीनंतर, काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल म्हणाले, "राहुल गांधी यांनी बैठकीत सांगितले की, ते लवकरच लोकसभेतील विरोधी पक्षनेते होण्याबाबत निर्णय घेतील.

"काँग्रेस वर्किंग कमिटीने एकमताने राहुल गांधींना लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याची विनंती केली. संसदेत विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्यासाठी राहुलजी सर्वोत्तम व्यक्ती आहेत," असेही वेनुगोपाल म्हणाले.

राहुल गांधी रायबरेली किंवा वायनाड यापैकी कोणत्या मतदारसंघातून राजीनामा देणार आहेत असे विचारले असता ते म्हणाले, "हा निर्णय 17 तारखेपूर्वी घ्यावा लागेल आणि तो 3-4 दिवसांत येईल."

दरम्यान यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेलीतून लोकसभा निवडणुकीसाठी उभारले होते. यामध्ये दोन्ही ठिकाणांहून त्यांनी निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना एका मतदारसंघातून राजीनामा द्यावा लागणार आहे. राहुल गांधी कोणता मतदारसंघ सोडणार याकडे सर्व देशभराचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे यंदा लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करत काँग्रेसने 99 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे 10 वर्षांनंतर लोकसभेला पहिल्यांदा विरोधी पक्षनेता लाभणार आहे. अशात राहुल यांनी गेल्या काही वर्षांत संसदेसह संसदेबाहेर मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. त्यामुळेच पक्षाचे खासदार राहुल यांना विरोधीपक्षनेते होण्यासाठी आग्रह करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.