Bharat Jodo : कडाक्याच्या थंडीतही टी-शर्टच का? राहुल गांधींनी सांगितलं खरं कारण; म्हणाले...

Rahul Gandhi
Rahul Gandhi
Updated on

नवी दिल्ली - भारत जोडो यात्रेदरम्यान कडाक्याची थंडी असूनही टी-शर्ट घालण्यावरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी यात्रेत टी-शर्टच परिधान करण्याचे कारण सांगितलं. यावेळी राहुल गांधी यांनी केरळपासून सुरू झालेली यात्रा आणि तेथील वातावरण याविषयी माहिती दिली. (Rahul Gandhi news in Marathi)

Rahul Gandhi
Bank Privatisation: आता 'ही' सरकारी बँक विकली जाणार; सरकारने सांगितला प्लॅन

राहुल गांधी म्हणाले की, "लोक मला विचारतात की मी हा पांढरा टी-शर्ट का घातला आहे, मला थंडी वाजत नाही का? वास्तविक प्रवास सुरू झाला तेव्हा... केरळमध्ये हवामान उष्ण आणि दमट होतं, पण आम्ही मध्य प्रदेशात प्रवेश केला तेव्हा थोडी थंडी होती." मात्र मध्य प्रदेशात 'फाटलेल्या कपड्यांमध्ये कुडकुडत असलेल्या' तीन गरीब मुलींना भेटल्यानंतर मी या यात्रेत केवळ टी-शर्ट घालण्याचा निर्णय घेतला.

Rahul Gandhi
Mission Lotus: इंदुरीकरांच्या सासुबाई सरपंच झाल्यानंतर गेल्या 'या' पक्षात

हरियाणाच्या अंबालामध्ये एका सभेत बोलताना ते म्हणाले, "एके दिवशी फाटलेल्या कपड्यांमधल्या तीन गरीब मुली माझ्याकडे आल्या होत्या..उबदार कपडे घातलेले नसल्यामुळे त्या मुली कुडकुडत होत्या. त्या दिवशी मी पण कुडकुडेपर्यंत टी-शर्ट घालायचं ठरवलं."

राहुल पुढं म्हणाले की, जेव्हा मी जेव्हा कुडकुडायला लागेल, तेव्हा मी स्वेटर घालण्याचा विचार करेन. यातून मला त्या तीन मुलींना एकच संदेश द्यायचा की, जर तुम्हाला थंडी वाजत असेल तर राहुल गांधी देखील तीच थंडी सहन करेल.

हेही वाचा योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.