नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार (Congress) आणि प्रमुख नेते राहुल गांधी (Rahuk Gandhi) पुन्हा एकदा परदेश दौऱ्यावर रवाना झाले आहेत. पक्षाचं म्हणणं आहे की, राहुल गांधींचा हा दौरा खाजगी दौरा आहे. राहुल गांधींच्या या दौऱ्यामुळे पंजाबमध्ये होणारी त्यांची निवडणूक प्रचार सभा स्थगित झाली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आधीच राहुल गांधी जवळपास एका महिन्यासाठी परदेश दौऱ्यावर होते तसेच अधिवेशन सुरु व्हायच्या आधी एक दिवस ते परतले होते. उत्तर प्रदेशसहित देशातील प्रमुख पाच राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुका होत असतानाच राहुल गांधींचा हा खाजगी दौरा होत आहे.
काँग्रेसचे महासचिव रणदीप सुरजेवाला यांनी एएनआयला माहिती देताना म्हटलंय की, राहुल गांधी आपल्या एका खाजगी दौऱ्यासाठी परदेशी गेले आहेत. भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या माध्यमातील मित्रांनी अनावश्यक पद्धतीने अफवा पसरवू नयेत. राहुल गांधी कोणत्या देशात निघाले आहेत, हे मात्र त्यांनी सांगितलं नाहीये. तसेच ते कधी परतणार आहेत, हे देखील सांगितलं नाहीये. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या सगळ्याच राज्यांत सध्या प्रचार शिगेला पोहोचला असून या राज्यांमध्ये काँग्रेस महत्त्वाचा पक्ष आहे.
पंजाबमध्ये प्रस्तावित आहेत सभा
राहुल गांधींच्या या दौऱ्याचा निवडणूक प्रचारावर देखील परिणाम होणार आहे. पंजाबमधील मोगामध्ये आगामी तीन जानेवारी रोजी त्यांची प्रचारसभा होणार आहे, मात्र आता ती रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. सत्तेत परतण्यासाठी काँग्रेस सध्या जोर लावत आहे.
पाच जानेवारीला पंतप्रधानांची सभा
पंजाबमध्ये मात्र भाजपने जोर लावला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या पाच जानेवारी रोजी मोदींची सभा आहे. भाजप ही निवडणूक कॅप्टन अमरिंदर सिंगांनी स्थापन केलेल्या पंजाब लोक काँग्रेस या पक्षासोबत लढणार आहे. राहुल गांधी परतल्यानंतर काँग्रेसच्या सभा होऊ शकतील, असं सूत्रांचं म्हणणं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.