नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधींना आव्हान देणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा अमेठी लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला. यामुळं त्यांना पुन्हा खासदारकीची टर्म पूर्ण करता आली नाही. त्यामुळं त्यांना आपला सरकारी बंगल्यातील सोडावा लागला आहे. पण याची बातमी येताच सोशल मीडियावर स्मृती इराणींना नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. पण विशेष म्हणजे राहुल गांधींनी स्मृती इराणी यांच्या बचावासाठी ट्विट केलं आहे.
स्मृती इराणी यांच्याबद्दल कुणीही अपशब्द वापरू नये, असं आवाहन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे केलं आहे. "हार जीत हा जीवनाचा एक भाग आहे. स्मृती इराणी किंवा इतर कोणत्याही नेत्याबद्दल अपशब्दांचा वापर करू नये. कुणाचा अपमान करणे ही दुर्बलतेची खूण आहे शक्तीची नाही," असंही त्यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय घडलं?
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्मृती इराणी यांनी लुटियंस दिल्लीतील २८ तुघलक क्रिसेंट इथला आपला सरकारी बंगला खाली केला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांनी आपलं सरकारी निवासस्थान सोडलं. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारमधील १७ केंद्रीय मंत्र्यांचा पराभव झाला होता. त्यामुळं या मंत्र्यांना ११ जुलैपर्यंत आपापले सरकारी बंगले खाली करण्याची वेळ देण्यात आली होती. याची नोटीहसही त्यांनी पाठवण्यात आली होती.
अमेठीतून काँग्रेस नेते किशोरी लाल शर्मा यांच्याविरोधात १.५ लाखांहून अधिक मतांनी स्मृती इराणी यांचा पराभव झाला होता. इराणी यांनी २०१९ च्या निवडणुकीत अमेठीतून राहुल गांधी यांचा पराभव केला होता. त्यामुळं यंदा इराणींनी पुन्हा राहुल गांधींना अमेठून लढण्याचं आव्हान दिलं होतं.
मालवीय यांचा राहुल गांधींवर निशाणा
राहुल गांधी यांच्या ट्विटला उत्तर देताना भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी म्हटलं की, "हे आजवरचं सर्वात कपटपूर्ण ट्विट आहे. काँग्रेस नेत्यांना एखाद्या श्वापदासारखं त्या महिलेला ट्रोल करण्यासाठी सोडून दिल्यानंतर राहुल गांधींनीच इराणी यांना अमेठीतून हारवलं आणि त्यांचा अहंकार संपवला असं म्हटलं जात आहे"
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.