Rahul Gandhi : ज्यांच्या जातीचा पत्ता नाही ते जनगणनेची मागणी करतायेत; राहुल गांधींबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान

Rahul Gandhi vs Anurag Thakur : लोकसभेत भाजपचे नेते अनुराग ठाकुर आणि राहुल गांधी यांच्यात जातनिहाय जनगणनेवरून चांगलीच खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.
Rahul Gandhi vs Anurag Thakur
Rahul Gandhi vs Anurag Thakur
Updated on

लोकसभेत भाजपचे नेते अनुराग ठाकुर आणि राहुल गांधी यांच्यात जातनिहाय जनगणनेवरून चांगलीच खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. इतकेच नाही तर जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून एकमेकांच्या खासगी आयुष्यावर देखील भाष्य करण्यात आले. भाजप खासदारांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर बोलताना जातीवाचक टीका केल्याने मोठा गदारोळ झाला.

अनुराग ठाकुर म्हणाले की, जातनिहाय जनगणनेचं भूत काही लोकांच्या डोक्यात शिरलं आहे. पुढे बोलताना ठाकुर जातीनिहाय जनगणना करण्याच्या मागणीबद्दल कोणाचे नाव न घेता म्हणाले की, ज्यांच्या जातीचा पत्ता नाही ते गणना करण्याबद्दल बोलत आहेत. अनुराग ठाकुर यांच्या या वक्तव्यावर राहुल गांधी चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळालं. तुम्हाला माझी जेवढा अपमान करण्याची इच्छा आहे तेवढा करा. मी सहन करेल. मात्र जातीनिहाय जनगणना केल्याशिवाय राहाणार नाहीत, असे राहु गांधी म्हणाले.

यावर अनुराग ठाकुर पुन्हा टोमणा मारत म्हणाले की, त्यामध्ये तुम्हाला आपली जात देखील लिहाली लागेल. यांना मधे बोलायला देखील चिठ्ठी दिली जाते. शेवटी उधार घेतल्या बुद्धीने काम कसं चालेल. काही लोकांच्या डोक्यात जातनिहाय जनगणनेचं भूत शिरलंय. मी म्हणालो होतो की ज्यांची जातच माहिती नाही, ते देखील गणना करण्याबद्दल बोलत आहेत. मी कोणाचेही नाव घेतले नव्हते. पण उत्तर द्यायला कोण उभं राहिलं. यावर राहुल गांधी पुन्हा उभे राहिले आणि म्हणाले की, जो कोणी या देशात ओबीसी, दलित आणि आदिवासी यांचे प्रश्न मांडतो, त्याला शिव्या खाव्या लागतात. मी या शिव्या आनंदाने ऐकून घेईल.

Rahul Gandhi vs Anurag Thakur
Ravindra Waikar : महाराष्ट्र सदनात खासदारांनाच मिळेनात सुविधा! वायकरांनी वाचला गैरसोयींचा पाढा; थेट मुख्यमंत्र्यांना लिहीलं पत्र

राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, महाभारतात अर्जुनाला फक्त माशाचा डोळा दिसत होता. त्याचप्रमाणे मला देखील जातनिहाय जनगणना दिसत आहे. आम्ही ती केल्याशिवाय राहाणार नाही. राहुल गांधी पुढे म्हणाले की, अनुराग ठाकुर यांनी मला शिवी दिली आहे, पण मला त्यांच्याकडून माफीची अपेक्षा नाही. मी लढाई लढतोय. मला कितीही शिव्या द्या.

एवढेच नाही तर अखिलेश यादव यांनी देखील या चर्चेत हस्तक्षेपही केला. ते म्हणाले की, तुम्ही कोणाची जात विचारू शकत नाहीत. यावर अनुराग ठाकूर यांनी मी कोणाचेही नाव घेतले नसल्याचा पुनरुच्चार केला. माझ्या भाषणाचे रेकॉर्ड तपासा असे उत्तर दिले.

Rahul Gandhi vs Anurag Thakur
Telegram CEO Pavel Durov : टेलीग्रामच्या सीईओची 12 देशात 100हून अधिक 'मुलं'; स्वतःच केला खळबळजनक खुलासा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.