Election Result: राहुल गांधी यांच्यासाठी धोक्याची घंटा, थेट लढत झाल्यावर भाजपने काँग्रेसलाच दाखवले आस्मान!

छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपने विजय मिळवला आहे, तर तेलंगणामध्ये काँग्रेसने विजय मिळवला आहे.
Election Result
Election ResultEsakal
Updated on

छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपाची सत्ता स्थापनेकडे वाटचाल सुरू आहे. तर, तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समितीला पराभवाचा सामना करावा लागला असून काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. पण, राजस्थान आणि छत्तीसगडसारखी राज्ये काँग्रेसच्या हातून निसटली आहेत. छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत झाली आहे. तर तेलंगणामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत नव्हती. आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून या राज्याच्या निकाल महत्त्वाचे मानले जात आहेत. अशातच ३ राज्यातील पराभव काँग्रेससाठी मोठा धक्का असणार आहे. (Latest Marathi News)

आत्तापर्यंत पार पडलेल्या निवडणुकांमध्ये बऱ्याच वेळा पंतप्रधान मोदी विरूध्द राहुल गांधी अशी थेट लढत झाली आहे. विशेष म्हणजे, २०१४ पासून आतापर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणुकीत मोदी विरुद्ध राहुल गांधी थेट लढत झाली तेव्हा राहुल गांधींचा पराभव झाला. कित्येकदा भाजपने ठरवून निवडणुकीचा मुद्दा राहुल गांधी यांच्या विरुद्ध फिरवल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडून मोठे प्रयत्न करण्यात येत आहेत. (Marathi Tajya Batmya)

गेल्या काही वर्षात राहुल गांधींच्या इमेजचा मेकओव्हर देखील केला जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राहुल गांधी भारत जोडो यात्रेमुळे चांगलेच चर्चेत आले होते. भारत जोडो यात्रेमुळे काही राज्यांमध्ये राहुल गांधीना यश मिळेल अशी आशा होती. मात्र, त्या राज्यांमध्ये देखील काँग्रेसला फटका बसला आहे.

Election Result
Rajasthan Congress : 'पेपर लीक, लाल डायरी,भ्रष्टाचाराचे आरोप.. ' पाच वर्षांपूर्वी मजबूत असलेली काँग्रेस अशी कमकुवत होत गेली

त्याचबरोबर कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठं यश मिळालं होतं. या विजयामुळे मिळालेला कॉन्फिडन्स काँग्रेसला होता. त्याचबरोबर तिन्ही राज्यांमध्ये आलेले एक्झिट पोल देखील काँग्रेसचा विजय दाखवत होते. मात्र, निकाल जेव्हा समोर आले तेव्हाचे चित्र वेगळे होते.(Latest Marathi News)

गेल्या काही दिवसांमध्ये राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वेगवेगळ्या कारणांमुळे टीका केली होती. अदाणी, अंबानी, ईडी कारवाई, मणिपूर हिंसाचार, ब्रिजभूषण सिंह या सर्व मुद्यांवरून त्यांनी मोदींना कोडींत पकडण्याचा प्रयत्न केला होता. तर या सर्व मुद्यावरून जनता काँग्रेसला कौल देईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता.

Election Result
Phalodi Satta Bazar: एक्झिट पोल फसले, पण सट्टा कधीच चुकत नाही... काय आहे नेहमी खरा ठरणारा फलोदी बाजार

भारताने आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप हरल्यानंतर तो सामना गुजरातमध्ये खेळवला गेला म्हणून त्यांच्यावर सोशल मिडीयाच्या माध्यमांतून टीका केली जात होती. अशातच राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर 'पनौती' म्हणून टीका केली. त्यानंतर राहुल गांधींना नोटीस देखील मिळाली. मात्र, त्यांनी टीका करणं बंद केलं नाही.

या निवडणुकांमध्ये फक्त राहुल गांधींच नाही तर प्रियंका गांधीसुद्धा ताकदीने उतरल्या होत्या. त्यांनी देखील रोड शो आणि सभा घेतल्या होत्या. पण, त्याचा इतका फायदा झालेला दिसत नाही.

Election Result
Fadnavis on Results : फडणवीसांनी सांगितलं भाजपच्या विजयाचं गुपित; अशी वाढली मतांची टक्केवारी...

मोदींना झालेला फायदा

राजस्थानमध्ये दरवर्षी सत्ता बदलण्याची प्रथा आहे, त्यानुसार या निवडणुकीतही सत्तापालट होताना दिसत आहे. काँग्रेसला या वर्षी ही परंपरा बदलणार नाही अशी आशा होती. मात्र, त्यांच्या पदरी निराशा आली आहे. भाजपने या निवडणुकीत वेगळीच खेळी करत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारच दिला नाही. सगळीकडे ब्रँड मोदीवर निवडणूक लढवली गेली. पक्षात बंड होऊ नये म्हणून त्यांनी उमेदवार देताना काळजी घेतली होती. लोकसभेची सेमीफायनल म्हणूनच ही निवडणूक लढवली गेली होती. याचा परिणाम मतदान राष्ट्रीय मुद्द्यावर झाले. हिंदुत्वाचा मुद्दा चर्चेत आला. मोदी विरुद्ध गांधी सरळ लढत झाली आणि फायदा मोदींना झाला.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.