Rahul Gandhi Video : राहुल गांधी हमालाच्या भूमिकेत; रेल्वे स्टेशनवरील व्हिडीओची होतेय चर्चा

Rahul Gandhi wears porters coolie red uniform carries load at anand vihar railway station watch video
Rahul Gandhi wears porters coolie red uniform carries load at anand vihar railway station watch video
Updated on

काँग्रेस नेते राहुल गांधी हे आज सकाळी दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्थानकावर पोहोचले. यावेळी त्यांनी येथील रेल्वे स्थानकावर काम करणाऱ्या हमालांची भेट घेतली. त्याच्याशी संवाद देखील साधला. राहुल गांधी यांनी यावेळी हमालांच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांना काम करताना येणाऱ्या अडचणींबाबत माहिती घेतली. गेल्या महिन्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राहुल गाधी त्यांच्या भेटीसाठी पोहचले होते.

Rahul Gandhi wears porters coolie red uniform carries load at anand vihar railway station watch video
Sukha Duneke killed : कॅनडामध्ये पंजाबी गँगस्टर सुखदूल सिंग सुक्खा याची हत्या

दरम्यान यावेळी हमालांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी रेल्वे स्थानकावर सामान देखील उचललं. तसेच राहुल गांधींनी रेल्वे स्टेशनवर पोर्टरचा लाल गणवेश देखील परिधान केल्याचे पहायला मिळाले. दरम्यान राहुल गांधी यांच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

Rahul Gandhi wears porters coolie red uniform carries load at anand vihar railway station watch video
Canada PM : G20 परिषदेमध्येही सुरू होते कॅनडाच्या पंतप्रधानांचे नखरे; नेमून दिलेल्या रुममध्ये राहण्यास दिला नकार - रिपोर्ट

काँग्रेस पक्षाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर (पूर्वीचे ट्विटर) राहुल गांधी आणि कुलींच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी एका व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये रेल्वे स्टेशनवरील कुली बांधवानी त्यांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. आज राहुल गांधी यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. भारत जोडो यात्रा सुरूच आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

यापूर्वीही घेतली होती भेट

काँग्रेस नेते राहुल गांधी यापूर्वीही हमालांची भेट घेतली होती. गेल्या वर्षी ते उदयपूर येथील काँग्रेसच्या चिंतन शिबिरात जात असताना त्यांनी कुली असोसिएशनच्या सदस्यांची भेट घेतली होती. राहुल गांधी नेहमीच सर्वसामान्यांना भेटताना दिसतात. नुकतेच त्यांनी एका भाजी विक्रेत्याला आणि त्याच्या पत्नीला आपल्या घरी बोलावले होते आमि त्ंयाच्यासोबत जेवण करत त्यांच्यासोबत चर्चा केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.