Rahul Gandhi : पंतप्रधान मणिपूरला का जात नाहीत, मला माहित आहे, पण...; राहुल गांधींचं मोठं विधान

Rahul Gandhi and Narendra Modi
Rahul Gandhi and Narendra Modi
Updated on

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत गुरुवारी रेकॉर्डब्रेक भाषण केलं. यावेळी मोदींनी दोन तासाहून अधिक वेळ भाषण केलं. मात्र पहिल्या दीड तासांत मोदींनी मणिपूरचा नामोल्लेखही केला नव्हता. त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर मोदींनी विरोधकांचा समाचार घेत आक्रमक टीका केली. मोदींच्या आक्रमक भाषणाला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज चोख प्रत्युत्तर दिलं.

Rahul Gandhi and Narendra Modi
Sedition Law: राजद्रोहाचा कायदा होणार रद्द, अमित शाहांची मोठी घोषणा

राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी लोकसभेत हासून बोलत होते. मणिपूर जळत असताना मोदी लाजिरवाण्या पद्धतीने बोलत होते. हे अत्यंत वाईट होतं. भाजपला मणिपूर शांत करायचं नाही.फोडा आणि राज्य करा, हेच मोदींचं धोरण आहे. मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या झाल्याचं राहुल गांधी म्हणाले.

पुढं राहुल गांधी म्हणाले की, मणिपूर मागील चार महिन्यांपासून जळत आहे. ते लोकसभेत बसून हसत आहेत. हे थांबायला हवं. भारत जळतोय, यावर काही तरी करायला हवं. तसेच मोदी मणिपूरला का जात नाही, हे मला ठावूक आहे. पण मी ते सांगू शकत नाही,असंही राहुल गांधी यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.