Rahul Gandhi: मानहानी प्रकरणी निकालाला आठवडा उलटल्यावर काँग्रेसच्या हालचाली सुरू

राहुल गांधी आज सुरतच्या सत्र न्यायालयात याचिका दाखल करणार
Rahul Gandhi News
Rahul Gandhi Newssakal
Updated on

मानहानी प्रकरणातील शिक्षेविरुद्ध काँग्रेस नेते राहुल गांधी आज सुरतच्या सत्र न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. काँग्रेस सूत्रांच्या माहितीनुसार राहुलना दोषी ठरविणाऱ्या न्यायदंडाधिकाऱ्यांचा आदेश रद्द करण्याची मागणी या याचिकेत केली जाईल. तर, राहुल यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे दिल्लीतील तसेच महाराष्ट्र आणि गुजरातमधील नेते सुरत येथे धडकणार आहेत.

सुरत न्यायालयाच्या निकालाला आठवडाभरापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. यानंतरही राहुल यांची आव्हान देणारी याचिका दाखल झाली नव्हती. त्यामुळे वेगवेगळे अंदाज लढविण्यात येत होते. याचिका लवकर दाखल केली जाईल असे काँग्रेसकडून अधिकृतपणे सांगण्यात आले होते. परंतु ‘मोदी‘ आडनावाशी निगडित अन्य न्यायालयांमध्ये (प्रामुख्याने पाटणा न्यायालयात) सुरू असलेल्या खटल्यांमुळे कायदेशीर अडचण होऊ नये याची पडताळणी करूनच राहुल यांची याचिका दाखल केली जाईल, अशीही माहिती काँग्रेसमधून पुढे आली होती. त्यानुसार उद्या सुरतच्या सत्र न्यायालयात राहुल याचिका दाखल करणार आहेत.

Rahul Gandhi News
Congress: काँग्रेसच्या 'लोकशाही वाचवा' कार्यक्रमादरम्यान दुर्घटना; अचानक कोसळलं स्टेज video Viral

कोलार (कर्नाटक) येथे २०१९ मध्ये झालेल्या सभेदरम्यान राहुल यांनी मोदी आडनावावरून केलेल्या टिपणीविरोधात भाजपचे गुजरातमधील आमदार पूर्णेश मोदी यांनी सुरत न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. शिक्षेला आव्हान देण्यासाठी न्यायालयाने ३० दिवसांची मुदतही दिली आहे. न्यायालयाने दिलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेमुळे लोकप्रतिनिधित्व कायद्यातील तरतुदीनुसार राहुल यांना वायनाड लोकसभा मतदारसंघाची खासदारकी गमवावी लागली. पाठोपाठ न्यायालयाच्या निकालानंतर लोकसभा सचिवालयाने अपात्र ठरविल्याचा आदेश जारी केल्यामुळे चार वेळचे खासदार असलेल्या राहुल यांना दिल्लीतील १२, तुघलक लेन हे शासकीय निवासस्थानही सोडावे लागले आहे.

Rahul Gandhi News
Ramdas Kadam: 'रामदास कदमांच्या पराभवाच्या आदल्या रात्री कुत्री रडत होती', राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका

वेगवान कारवाईवर प्रश्नचिन्ह

न्यायालयाच्या निकालानंतर अवघ्या काही तासांमध्ये राहुल यांची खासदारकी रद्द करण्यासाठी लोकसभा सचिवालयाकडून विद्युत वेगाने झालेल्या कारवाईवर काँग्रेसमधून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. तर, अपात्रतेची कारवाई सुडाची असल्याचा आरोप राहुल यांनी मोदी सरकारवर केला. दुसरीकडे सत्ताधारी भाजपने हा संपूर्ण मुद्दा ओबीसी समुदायाच्या अपमानाशी निगडित असल्याचे म्हटले होते. राहुल यांच्यावरील कारवाई योग्य ठरविताना भाजपने राहुल यांच्या शिक्षेला न्यायालयीन प्रक्रियेद्वारे आव्हान देण्याऐवजी पंतप्रधान मोदींवर आरोप करत आहेत, हा कोणता अहंकार आहे, असा सवालही केला होता.

Rahul Gandhi News
PM मोदींच्या बाजूनं कपिल सिब्बल लढणार; नेमकं काय आहे प्रकरण?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.