राहुल गांधी घेणार सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबीयांची भेट

Rahul Gandhi will visit Sidhu Moosewalas family
Rahul Gandhi will visit Sidhu Moosewalas familyRahul Gandhi will visit Sidhu Moosewalas family
Updated on

पंजाबी गायक (Punjabi singer) सिद्धू मुसेवालाच्या हत्येच्या एका आठवड्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. ते मंगळवारी (ता. ७) सिद्धू मुसेवाला यांच्या मुसा गावात पोहोचतील. हे गाव पंजाबमधील मानसा जिल्ह्यात आहे. मुसेवाला हे काँग्रेसचे नेतेही होते. त्यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मानसा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना आपचे उमेदवार विजय सांगला यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. सोमवारी (ता. ६) ज्येष्ठ नेते सचिन पायलट यांनीही सिद्धू मुसेवाला (Sidhu Musewala) यांच्या गावात जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. (Rahul Gandhi will visit Sidhu Moosewalas family)

सिद्धू मुसेवाला (Sidhu Musewala) यांच्या हत्येनंतर काँग्रेसच्या विविध राज्य घटकांनी श्रद्धांजली वाहताना ट्विट केले होते. मुसेवाला यांचा तरुणांमध्ये मोठा चाहतावर्ग आहे. ज्या दिवशी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला, त्याच दिवशी पंजाब काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष अमरिंदर राजा वाडिंगही त्यांच्या घरी पोहोचले. मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी काँग्रेस पंजाबच्या आप (Aap) सरकारवर सातत्याने प्रश्न उपस्थित करीत आहे.

Rahul Gandhi will visit Sidhu Moosewalas family
वादग्रस्त वक्तव्यानंतर संतापलेल्या कतारला भारताने दिले उत्तर; म्हणाले...

पंजाब सरकारने हत्येच्या एक दिवस आधीच राज्यातील ४२४ लोकांची सुरक्षा कमी केली होती. या लोकांमध्ये सिद्धू मुसेवालाचाही समावेश होता. अशा स्थितीत त्यांची हत्या हा राजकीय मुद्दा बनला आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबीयांनी केंद्र सरकारकडे हत्येची सीबीआय किंवा एएनआय चौकशीची मागणी केली आहे.

हरयाणातील तीन जणांना पकडले

रविवारी सिद्धू मुसेवाला (Sidhu Musewala) यांच्या कुटुंबीयांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी पंजाब पोलिसांनी हरयाणातून आणखी एकाला अटक केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत हरयाणातील तीन जणांना पोलिसांनी पकडले आहे. तिघेही फतेहाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहेत. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर तीन दिवसांनी पवन बिश्नोई आणि नसीब नावाच्या दोघांना मोगा पोलिसांनी अटक केली होती. हे दोघेही लॉरेन्स बिश्नोईच्या जवळचे आहेत. त्याच्या टोळीचा भाग असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.