Rahul Gandhi : ‘एमएसपी’चा अधिकार मिळवून देऊ;राहुल गांधी यांचे शेतकरी नेत्यांना आश्वासन

किमान हमी भावाचा (एमएसपी) वैधानिक अधिकार मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारला भाग पाडू असे आश्वासन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज शेतकरी नेत्यांना दिले.
Rahul Gandhi
Rahul Gandhi sakal
Updated on

नवी दिल्ली : किमान हमी भावाचा (एमएसपी) वैधानिक अधिकार मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारला भाग पाडू असे आश्वासन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज शेतकरी नेत्यांना दिले. पंजाब व हरियानासह देशातील शेतकरी नेत्यांनी आज संसदेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली.

‘एमएसपी’च्या मागणीसाठी पंजाब आणि हरियानासह देशभरातील शेतकऱ्यांचे विविध भागांत आंदोलन सुरू आहे. या भेटीनंतर बोलताना राहुल गांधी म्हणाले,‘‘ शेतकरी नेत्यांशी सविस्तर चर्चा केली आहे. काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासन दिले होते. या मागणीला वैधानिक रूप देता येते.

यासंदर्भात इंडिया आघाडीच्या इतर नेत्यांशी चर्चा करून केंद्र सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. ‘एमएसपी’ हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे.’’ शेतकऱ्यांच्या या शिष्टमंडळात संयुक्त किसान मोर्चाचे (एसकेएम) जगजित सिंग, लखविंदर सिंग, शांता कुमार, अभिमन्यू कोहाड, वेंकटेश्वर राव, पांडियन रामलिंगम व किसान मजदूर मोर्चाचे (केएमएम) तेजवीरसिंग, सरवरसिंग पंधेर, सुरजीत सिंग, रमणदीप सिंग मान, गुरमीत सिंग व अमरजीत सिंग उपस्थित होते.

याशिवाय काँग्रेसचे खासदार राजा वारिंग ब्रार, खासदार सुखविंदर सिंग रंधावा, खासदार गुरजीत सिंग औलजा, खासदार धर्मवीर गांधी, खासदार दीपेंद्र हुडा, खासदार जयप्रकाश व खासदार चरणजित सिंग चन्नी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com