Rahul Gandhi: अन् राहुल गांधी दिसले गाडीचा स्क्रू आवळताना, ट्रक ड्रायव्हिंग नंतर नवा भारत जोडो

राहुल गांधी दिल्लीतील करोल बाग येथे बाईक मेकॅनिकसोबत चर्चा करतांना दिसले.
Rahul Gandhi
Rahul Gandhi
Updated on

काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी ट्रक ड्रायव्हिंग करताना दिसले तर आता दुचाकी दुरुस्त करत असतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. भारत जोडो यात्रेनंतर नव्या भूमिकेत राहुल गांधी दिसत आहेत. विशेष म्हणजे राहुल गांधींनी फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे. Rahul Gandhi's Evening With Motorcycle Mechanics At Delhi Market

राहुल गांधी मंगळवारी दिल्लीतील करोल बाग परिसरात असलेल्या एका बाजारपेठेत गेले. बाजारपेठेत जाताच बरोबर राहूल गांधींना नागरिकांनी घेराव घातला आणि फोटो काढण्यासाठी गर्दी करू लागले. यावेळी राहुल गांधींनी गॅरेजमध्ये जात मॅकेनिकसोबत संवाद साधला. इतकेच नाहीतर राहुल गांधींनी आपल्या हाताची कमाल दाखवत तेथील दुचाकीवर स्क्रू ड्राव्हर चालवला.

Rahul Gandhi
Rahul Gandhi Birthday : 'मुहब्बत की दुकान...!' उर्मिलाकडून राहुल गांधींना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

राहुल गांधींनी या सर्व घटनेची माहिती आपल्या इंस्टाग्रामवर दिली आहे. मॅकेनिकसोबत काम करत असल्याचा राहुल गांधींचा एक फोटो इंस्टाग्रामवर खूप व्हायरल होत आहे. या फोटोला इंस्टाग्रामवर राहुल गांधींनी एक कॅप्शन दिले आहे. पाना फिरवणाऱ्या आणि भारताची चाके फिरवणाऱ्या हातांकडून शिका, अशा प्रकारचे कॅप्शन राहुल गांधींनी दिले आहे.

ट्रक ड्रायव्हिंग

अमेरिकेच्या दौऱ्यातही त्यांनी ट्रकने प्रवास केला आणि भारतीय वंशाच्या चालकांची भेट घेतली. तसेच, राहुल गांधींनी ट्रकने दिल्ली ते चंदीगढपर्यंत प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी स्वत: ट्रक चालवला. ऐवढंच नाही तर ट्रक चालकांसोबत गप्पा मारुन त्यांच्याकडून समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

Rahul Gandhi
Rahul Gandhi: भावा किती कमाई करतोस? अमेरिकेतल्या ट्रक ड्रायव्हरचा पगार ऐकून राहुल गांधी शॉक!

डिलिव्हरी बॉयसोबत बाईकची स्वारी

यापूर्वी राहुल गांधींनी दिल्ली ते चंदीगड हा प्रवास ट्रकने पूर्ण केला होता, ज्याचा व्हिडिओ समोर आला होता. यावेळी राहुल गांधी यांनी ट्रक चालकांशी अनेक प्रश्नांवर चर्चा करून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. कर्नाटक निवडणुकीदरम्यान, राहुलने बेंगळुरूमध्ये डिलिव्हरी बॉयसोबत स्कूटर चालवली. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.